शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘डी गँग’ अजूनही मुंबईत सक्रिय !

By admin | Updated: June 3, 2015 03:27 IST

कुख्यात गुंड दाऊद कोठे आहे हे माहीत नाही, असे केंद्र सरकारने या महिन्याच्या आरंभी जाहीर केले असले तरीही दाऊदचा सहकारी छोटा शकील व मुंबईतील एक बिल्डर

डिप्पी वांकाणी, मुंबईकुख्यात गुंड दाऊद कोठे आहे हे माहीत नाही, असे केंद्र सरकारने या महिन्याच्या आरंभी जाहीर केले असले तरीही दाऊदचा सहकारी छोटा शकील व मुंबईतील एक बिल्डर यांच्यातील २०१२ साली पोलिसांनी टिपलेले टेलीफोनवरील संभाषण पाहिले, तर वेगळेच कथानक समोर येते.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने टिपलेल्या या संभाषणाचे काही अंश ‘लोकमत’ला मिळाले असून, या संभाषणात छोटा शकील आत्मविश्वासाने असे सांगतो, की मुंबईच्या पोलीस आयुक्तांची महिनाभरात बदली होईल व या बिल्डरची इच्छा असेल तर त्याची भाईशी (दाऊदशी) भेट होईल. पोलिसांनी हे संभाषण १७ आॅगस्ट २०१२ रोजी सायंकाळी ५.५१ वाजता टिपले आहे. शकील त्या वेळी कराचीहून बोलत होता, तर बिल्डर सौदी अरेबियातून बोलत होता. त्या वेळी पटनाईक मुंबईचे पोलीस आयुक्त होते. २३ आॅगस्टला पटनाईक यांना बढती देण्यात आली. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सरसंचालक हे पद देण्यात आले. हा बिल्डर बांद्रा येथील होता. जमिनी हिसकावून घेण्यासाठी तो कुप्रसिद्ध होता. त्याला काही वेळा अटकही झाली होती. आपल्याला लोक दाऊदचा माणूस म्हणून ओळखतात, असे तो शकीलला सांगत होता. मुंबईत मला कोणाचीही भीती नाही़ भीती असलीच तर ती पोलीस आयुक्तांची आहे, असे त्याने सांगितले़ त्यावर शकीलने त्याला पोलीस आयुक्तांची महिनाभरात बदली होईल, असे सांगितले होते. दोन महिने भूमिगत राहा, असे शकीलने या बिल्डरला सांगितले होते़ त्यानंतर तुझी भाईशी भेट करून देतो, असे आश्वासनही दिले होते. या संभाषणावरून दाऊद व त्याच्या टोळीला मुंबईत अजूनही रस असल्याचे दिसते व येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करेपर्यंत त्याची पोहोच आहे, असेही दिसते.