शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Cyclone Nisarga: चक्रीवादळ अलिबागच्या किना-यावर धडकले; पुढचे २-३ तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 4:49 PM

Cyclone Nisarga: मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. 

मुंबईः राज्यावर कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचं संकटही आलं आहे. या वादळामुळे अलिबाग, रायगड, मुंबई, ठाण्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचणार आहे. राज्य सरकारने या संकटाचा सामना करत अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दलाच्या टीम तैनात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला सतर्कतेचा आवाहन केलं आहे. रायगड जिल्ह्यातून वादळ पुढे सरकत असून, मुंबईच्या जवळून नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. निसर्ग वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडलेली आहे, बऱ्याच इमारतींवरील छपरे उडून गेली आहेत. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आत्तापर्यंत जीवितहानी कुठेही झालेली नाही. परिस्थिती या क्षणापर्यंत नियंत्रणात आहे. अलिबागजवळ समुद्र किना-यावर धडकले असून, त्याचा वेग ताशी १०० - ११० किमी आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. स्थानिक प्रशासन व NDRF मदत, बचावकार्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे. मी जिल्हाधिका-यांच्या संपर्कात असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.  चक्रीवादळानं काही तासांपूर्वीच महाराष्ट्राच्या भूमीवर प्रवेश केलेला आहे. अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातून ते वादळ पुढे जात आहे. या वादळाचा  ताशी वेग १०० किलोमीटरपेक्षा जास्त असून, ११० किमी  असल्याचा सांगितला जातो आहे. झाडं कोसळतायत, काही छतांचे पत्रे उडतायत ही स्थिती आहे. पण प्रशासन अलर्ट आहे. एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची आताच बोललो, तेसुद्धा चांगलं काम करत आहेत. वादळ जात असताना जीवितहानी होऊ नये, याची पूर्ण काळजी आपण  घेतो आहोत, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल

Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र 

Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळcycloneचक्रीवादळ