शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 8:11 PM

महाराष्ट्रात ३ जून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता

ठळक मुद्देपश्चिम किनारपट्टीवर रेड अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबईत अतिवृष्टीची शक्यता

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार असून, ते बुधवारी दुपारनंतर पश्चिम किनारपट्टीवर हरिहरेश्वर आणि दमण दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक जिल्हा; तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात ३ जून रोजी काही ठिकाणी अतिवृष्टी (२२० मिमीहून अधिक) होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची इशारा देण्यात आला आहे.निसर्ग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी अडीच वाजता पणजीपासून २९० किमी, मुंबईपासून ३८० किमी आणि सुरतपासून ६०० किमी अंतरावर होते. ते गेल्या ६ तासांमध्ये ताशी १३ किमी वेगाने किनार्‍याच्या दिशने पुढे सरकत आहे. मंगळवारी रात्री त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार असून, ते पश्चिम किनारपट्टीला धडकेल, त्यावेळी वार्‍याचा वेग १०० ते ११० किमी इतका असण्याची शक्यता आहे. किनार्‍यावर धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुरुवारी दुपारपर्यंत राहण्याचीशक्यता आहे.कोकण, गोव्यात येत्या २४ तासांत सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ जून रोजी कर्नाटक किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दक्षिण गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, दमण, दादरा आणि नगर हवेली व सुरत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर त्याचा परिणाम जमिनीवर अगदी धुळे, नंदुरबार, पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत जाणविणार आहे. महाराष्ट्र, गोव्याच्या किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्या वेळी या वार्‍यांचा वेग ११० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रात भरतीच्या वेळी १ ते २ मीटर इंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानेव्यक्त केला आहे. राज्यात मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कराड ४४, आजरा ४२, कोल्हापूर ३२, उस्मानाबाद २०, दाभोलीम १४, पणजी १३.६, औरंगाबाद १०, रत्नागिरी ८.३, जळगाव, सोलापूर ३.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.

इशारा३ जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना, अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेGujaratगुजरातRainपाऊसCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ