शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde - Uddhav Thackeray: ठाकरे-शिंदे वादामुळे मुंबईत रविवारपासून जमावबंदी; मिरवणुकांवरही बंदी; १५ दिवस जारी राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 07:53 IST

मुंबईत सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता भंग करुन मानवी जीवन व मालमत्तेस धोका पोहचविण्यात येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नजीकच्या काळात मुंबईत सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता भंग करुन मानवी जीवन व मालमत्तेस धोका पोहचविण्यात येणार असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरात १६ ऑक्टोबरपासून पुढील १५ दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त संजय लाटकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. 

शिवसेनेत झालेली फाटाफूट, ठाकरे आणि शिंदे गट यांचे राजकारण, उभयतांना मिळालेली चिन्हे, त्यावर राज्यभरात उमटत असलेल्या प्रतिक्रिया आणि त्यात अंधेरी विधानसभेची होऊ घातलेली पोटनिवडणूक या सर्व पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, १६ ऑक्टोबरपासून ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत १५ दिवस हे आदेश लागू राहणार आहेत. यात पाच किंवा अधिक व्यक्तीच्या एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोणतीही मिरवणूक आणि कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरनंतर या आदेशाची मुदत संपली तरी, कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते. तसेच, ती सुरू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेला कोणताही दंड, शिक्षा, जप्ती हा आदेश कालबाह्य झाला नसल्याप्रमाणे लागू केली जाऊ शकते, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आकाश कंदिलावरही बंदीसुरक्षेच्या कारणास्तव १६ ते १४ नोव्हेबरपर्यंत आकाश कंदील उडविण्यावरही मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. तसेच चायनीज कंदिलाच्या विक्रीसह त्याच्या साठा करून ठेवण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. दिवाळीत समुद्रकिनारी तसेच इमारतीच्या टेरेसवरून मोठ्या प्रमाणात नागरिकांकड़ून आकाश कंदील उडविले जातात. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबईPoliceपोलिस