शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्याची खोटी तक्रार करणे क्रूरता

By admin | Updated: September 21, 2015 01:10 IST

पती व त्याच्या नातेवाइकांना फौजदारी प्रकरणात अडकविण्यासाठी

नागपूर : पती व त्याच्या नातेवाइकांना फौजदारी प्रकरणात अडकविण्यासाठी हुंड्याची खोटी तक्रार नोंदविणे ही बाब क्रूरता ठरते, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील आदेशामध्ये नोंदविला आहे. या प्रकरणात न्यायालयाने क्रूरतेच्या आधारावर पतीला घटस्फोट मंजूर केला.महेश व मान्यता (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी असून, त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. एकत्र कौटुंबिक जीवन जगणे कठीण झाल्यानंतर महेशने घटस्फोट तर, मान्यताने पोटगी मिळण्यासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. ६ डिसेंबर २००६ रोजी कौटुंबिक न्यायालयाने महेशची याचिका फेटाळून लावली तर, मान्यताची याचिका स्वीकारून १५०० रुपये पोटगी मंजूर केली. या आदेशाविरुद्ध महेशने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती ए. आय. एस. चिमा यांनी एकंदरित परिस्थिती लक्षात घेता कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशात बदल करून महेशला घटस्फोट मंजूर केला. तर, पत्नीची पोटगी कायम ठेवण्यात आली आहे.महेश व मान्यताचे १९ मे २००२ रोजी लग्न झाले होते. वृद्ध आई-वडील महेशसोबत राहात होते तर, महेशचा भाऊ आपल्या कुटुंबासह वेगळा राहात होता. लग्नानंतर काही दिवसांतच मान्यताची वागणूक बदलली. ती क्षुल्लक कारणांवरून भांडत होती. कोणालाही न सांगता माहेरी जात होती. मान्यताच्या भांडणामुळे हृदयविकाराचा धक्का बसून महेशच्या वडिलांचा मृत्यू झाला.मुलगा झाल्यानंतरही मान्यताची वागणूक बदलली नाही. ती महेशच्या चारित्र्यावर संशय घेत होती. सासरचे घर सोडल्यानंतर मान्यताने पोलीस ठाण्यात जाऊन पती व त्याचे नातेवाईक हुंडा मागत असल्याची तक्रार नोंदविली. चौकशीमध्ये मान्यताच्या आरोपांत तथ्य आढळून आले नाही. यामुळे पोलिसांनी महेश व त्याच्या नातेवाइकांविरुद्ध एफआयआर नोंदविला नाही. या सर्व बाबी पतीसोबतची क्रूरता ठरत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.