शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

गर्दीत गुन्हेगार आता नाही लपू शकणार : देशात प्रथमच पालखीत वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 4:51 PM

गर्दीचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार मंगळसुत्र हिसकाविणे, पाकिटमारी, मोबाईल चोरी करणे असे गुन्हे करत असतात़..

ठळक मुद्देपीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजी पुणे पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची घेतली मदत पीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजीचा वापर करुन गेल्या दोन दिवसात काही सराईत गुन्हेगार जेरबंद

विवेक भुसे /तन्मय ठोंबरे पुणे : पालखी, गणपती विसर्जन अशा उत्सवात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात़. त्याचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार मंगळसुत्र हिसकाविणे, पाकिटमारी, मोबाईल चोरी करणे असे गुन्हे करत असतात़. लाखांच्या गर्दीत गुन्हेगारांवर नजर ठेवणे मानवी डोळ्यांना केवळ अशक्य असते़. त्यामुळे पुणेपोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली असून त्या देशात सर्वप्रथम वापर सध्या पालखीमध्ये करण्यात आला आहे़. या पीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजीचा वापर करुन गेल्या दोन दिवसात काही सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे़.गणेशविसर्जन मिरवणुकीच्या दिवशी काही तासात पुण्यातील विसर्जन मार्गावर दरवर्षी साधारण किमान एक हजार मोबाईल चोरीला जातात़. या सराईत चोरट्यांपैकी काही जणांपर्यंतच पोलीस पोहचू शकतात़. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर अशा गर्दीच्या वेळी नजर ठेवून त्यांनी गुन्हे करण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्याचे निश्चित केले़. त्यासाठी पीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजीची मदत घेण्यात आली़.ज्या ठिकाणी मोठी गर्दी असेल, अशा ठिकाणी ही पोलीस व्हॅन नेल्यास कॅमेरा गर्दीवरुन फिरु लागतो़. त्या गर्दीत जर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असेल तर इतक्या गर्दीतही हा कॅमेरा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला टिपतो व त्याची सुचना व्हॅनमध्ये असलेल्या पोलिसांना स्किनवर दिली जाते़. व्हॅनमधील पोलीस या गुन्हेगाराचे लोकेशन व त्याचे वर्ण जवळच्या पोलिसांना तातडीने कळवितात़. गुन्हेगाराचे वर्णन, त्याचा फोटो व गर्दीत त्याचे लोकेशन मिळाल्याने पोलीस इतक्या गदीर्तूनही त्याला नेमके शोधून काढू शकतात़संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या बुधवारी पुण्यात आल्या़ .या पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़. पालख्यांबरोबर चालणारे काही लाख वारकरी, नागरिक यांच्या बरोबरच पोलिसांच्या अशा दोन व्हॅन फिरत होत्या आणि गर्दीत मिसळून असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होती़ त्यातून काही गुन्हेगार पोलिसांच्या हाताशी लागले आहेत़. गुरुवारी पालख्यांचा मुक्काम पुण्यात असतो़. त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते़. त्या दोन्ही ठिकाणी या व्हॅन गर्दीतील गुन्हेगारांवर नजर ठेवून होत्या़. देशात अशा प्रकारे लाखोंच्या गर्दीवर व्हिजिलन्स करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचा सांगण्यात आले़.असे चालते या टेक्नॉलॉजीचे काम पोलिसांकडे रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची सर्व माहिती त्यांच्या छायाचित्रासह कॉम्प्युटरमध्ये साठविलेली असते़. एका पोलीस व्हॅनमध्ये इंजिनिअर, पोलीस कर्मचारी कॉम्प्युटरसह असतात़ या व्हॅनच्या वर हा पीटीझेड कॅमेरा बसविलेला असतो़. हा कॅमेरा व्हॅनमधील कॉम्प्युटरला जोडलेला असतो़. या कॉम्प्युटरमध्ये ज्या ज्या गुन्हेगारांची माहिती व छायाचित्र साठविण्यात आले आहेत़ त्याची माहिती कॅमेऱ्याला असते़  हा कॅमेरा ३६० अंशात फिरु शकतो़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक