शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे गृहित धरून पीकविम्याची रक्कम देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:01 IST

कंपन्यांकडून होणाऱ्या लुटीवरून संताप

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी व महसूल खात्याने पीक नुकसानीचे केलेल्या पंचनाम्यातील आकडेवारी प्रमाण मानून विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाईल. तशा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. शिवसेनेचे कैलाश घाडगे पाटील, ज्ञानराज चौगुले आणि भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्याबाबत झालेल्या अन्यायाबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्यावरून राज्यभरातील पीकविम्याचा प्रश्न ऐरणीवर आला. विमा कंपन्या मालामाल होत असून, शेतकऱ्यांना विम्याचा कुठलाही फायदा दिला जात नाही, अशी भावना सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या अखत्यारितील विमा कंपनीमार्फत बीड जिल्ह्यातील पीकविमा योजना चालविली जात असून, ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. ती राज्यभरात लागू करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारची स्वत:ची विमा कंपनी सुरू करण्याचा विचार आहे, तसेच एक सर्वंकष पीकविमा धोरण लवकरच आणले जाईल. विमा कंपन्यांच्या नफ्यावर मर्यादा आणावी आणि त्यावरील मिळालेला नफा त्यांनी शासनाकडे वळता करावा व तोटा आल्यास तो सरकारने सहन करावा, ही बाब विचाराधीन आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नाना पटोले, गिरीश महाजन, मेघना बोर्डीकर, समीर कुणावार, संभाजी पाटील निलंगेकर, प्रकाश सोळंके यांनी उपप्रश्न उपस्थित केले. 

५१७कोटीनफा एका जिल्ह्यात कंपनीने कमावलाn विमा कंपन्याच्या घशात किती मोठा नफा जात आहे, याची आकडेवारी भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली. n उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी, केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्श्यातून विमा कंपनीला ६०४ कोटी रुपये मिळाले व त्यातील फक्त ८७ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेपोटी देण्यात आले. कंपनीला ५१७ कोटी रुपयांचा नफा झाला, असा दावा पाटील यांनी केला.

विरोधकांचा सभात्यागपीकविम्याबाबत शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असून, सरकार समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप करीत भाजपच्या सदस्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात सभात्याग केला.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाvidhan sabhaविधानसभा