शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मराठा आरक्षणासाठी लावलेले मागासपणाचे निकष तकलादू, हायकोर्टात युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:48 AM

मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या कोणत्याही निकषांत बसत नाही, पण त्यांच्या मतांवर डोळा ठेवून मागालेपणाचे तकलादू निकष लावून या समाजास आरक्षण दिलेले असल्याने ते पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद मंगळवारी उच्च न्यायालयात केला गेला.

मुंबई -  मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या कोणत्याही निकषांत बसत नाही, पण त्यांच्या मतांवर डोळा ठेवून मागालेपणाचे तकलादू निकष लावून या समाजास आरक्षण दिलेले असल्याने ते पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद मंगळवारी उच्च न्यायालयात केला गेला.मराठा समाजास सरकारी नोकऱ्या व शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या कायद्याच्या वैधतेस आव्हान देणाºया याचिकांवरील अंतिम सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुरू झाली. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांच्या वतीने त्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हा युक्तिवाद केला. दुसºया याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद गुरुवारी सुरू होईल.अ‍ॅड. गुणरत्ने यांनी युक्तिवादात तीन मुद्द्यांवर विवेचन केले. त्यांचा पहिला मुद्दा होता, मराठा आरक्षणामुळे राज्यातील आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून, ती अवैध व घटनाबाह्य आहे. यासाठी त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये काढलेला आरक्षणाचा आदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेत केलेली भाषणे व सर्वोच्च न्यायालयाने एम. नागराज, इंदिरा सहानीसह अन्य प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांचे हवाले दिले.समानता व सर्वांना समान संधी हे राज्यघटनेचे मूळ तत्त्व आहे. आरक्षण हा त्याला अपवाद आहे. अपवाद हा नियमाहून वरचढ असू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा दुसरा मुद्दा होता राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल घेऊन त्याआधारे मराठा समाजास आरक्षण देण्याचा राज्य सरकारला मुळात अधिकारच नसल्याचा. त्यांचे म्हणणे होते की, स्वातंत्र्यापासून निव्वळ प्रशासकीय फतव्याने सुरू राहिलेल्या केंद्रीय मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा देणारी १०२ वी घटनादुरुस्ती गेल्या वर्षीच्या १५ आॅगस्टपासून लागू झाली. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाच्या मागासलेपणाची तपासणी या केंद्रीय आयोगाकडून करून घ्यायला हवी होती.मराठा समाजास मागास ठरविताना आयोगाने लावलेले तकलादू व असमर्थनीय निकष हा त्यांचा तिसरा मुद्दा होता. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, मराठा समाज हा कुणबी समाजाच भाग असल्याचे आयोगाने म्हटले आहे. ‘ओबीसी’साठी असलेले आरक्षण कुणबी समाजास लागू असताना, त्यातील मराठ्यांना त्याहून वेगळे आरक्षण कसे काय दिले जाऊ शकते?, असा त्यांचा सवाल होता. आयोगाने शैक्षणिक मागासलेपणात मराठा समाजास पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. पण अंदमान-निकोबार बेटांवरील आदिवासीही शंभर टक्के अशिक्षित नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.अ‍ॅड. सदावर्ते असेही म्हणाले की, आयोगाने अहवालात शेतकरी आत्महत्यांची चर्चा केली आहे. पण त्यातील आकडेवारी पाहता इतर समाजांच्या तुलनेत एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा शेतकºयांचे आत्महत्यांचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे दिसते. राज्याला १७ पैकी १२ मुख्यमंत्री देणाºया मराठा समाजास आर्थिकदृष्ट्या मागास असे फार तर म्हणता येऊ शकते.इतरांंकडून तुच्छ वागणूकमराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी या समाजास पूर्वापार कशी तुच्छतेची वागणूक दिली जात आहे, याचा निकषही आयोगाने लावला आहे. याची चार उदाहरणे आयोगाने दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र मानत असल्याने काशीहून आलेल्या गागाभट्टांनी राजांच्या राज्याभिषेकाचे धार्मिक विधी हाताच्या नव्हे तर पायाच्या बोटांनी करणे, कोल्हापूरमधील ब्राह्मणांनी मंत्रोच्चार करण्यास नकार दिल्याने शाहू महाराजांनी धार्मिक विधींसाठी राजस्थानहून ब्राह्मण आणणे, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एका ब्राह्मण मित्राच्या घरी जावायला गेले असता त्यांना वेगळ्या खोलीत जेवायला वाढणे आणि आपली जात उघड न करता एका ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करणाºया मराठा स्त्रीविरुद्ध त्या ब्राह्मणाने गुन्हा नोंदविणे. ही उदाहरणे समर्पक व पुरेशी नाहीत, असे अ‍ॅड. सदावर्ते यांचे प्रतिपादन होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण