शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा-यांवर फौजदारी कारवाई?

By admin | Updated: March 12, 2015 03:51 IST

शहरातील व्यापारी वार्षिक विवरणपत्र भरत नसल्याचा परिणाम एलबीटी उत्पन्नावर झाला असून एका वर्षात पालिकेचे १०० कोटींचे नुकसान झाले आहे

सदानंद नाईक , उल्हासनगरशहरातील व्यापारी वार्षिक विवरणपत्र भरत नसल्याचा परिणाम एलबीटी उत्पन्नावर झाला असून एका वर्षात पालिकेचे १०० कोटींचे नुकसान झाले आहे. पालिकेने चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी शासनाकडे पाठवून कारवाईची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळताच धाडसत्र व फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत उपायुक्त जमीर लंगेरवार यांनी दिले आहेत. उल्हासनगर पालिका एलबीटी विभाग वादात सापडला असून विभागाचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. व्यापारी एलबीटीचा भरणा नियमित करीत नसल्याचा फटका शहर विकासकामांना बसला असून गेल्या दोन वर्षांपासून विकासकामे ठप्प पडली आहेत. करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी पालिकेने तयार करून कारवाईच्या परवानगीसाठी शासनाकडे पाठविली आहे. तसेच वार्षिक विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने वार्षिक विवरणपत्र सादर न केलेल्या १२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे. पालिकेने पाठविलेल्या नोटिसा व्यापारी उघडूनही पाहत नसल्याचा प्रकार उघड झाला असून व्यापाऱ्यांवर धाडसत्र व फौजदारी गुन्हे पुढील आठवड्यापासून दाखल करण्याचे संकेत उपायुक्त लंगेरवार यांनी दिले आहेत. एलबीटी विभागात सावळा गोंधळ सुरू असून दबंग स्थानिक राजकीय नेते, व्यापारी, अधिकारी संगनमत करून एलबीटीची लूट करीत असल्याचा आरोप यापूर्वी महासभेत नगरसेवकांनी करून चौकशीची मागणी केली आहे. शहरातील नोंदणी झालेल्या १५ हजार व्यापाऱ्यांच्या व्यवहारांचे करपुनर्निर्धारण करण्याचे आयुक्तांनी ठरविले आहे. मात्र, ९० टक्के व्यापारी वार्षिक विवरणपत्र सादर करीत नसल्याने त्यांच्या व्यवहाराबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.