शंकराचार्यावर गुन्हा

By Admin | Updated: June 25, 2014 03:08 IST2014-06-25T03:08:30+5:302014-06-25T03:08:30+5:30

द्वारकेच्या शंकराचार्यानी घेतलेल्या आक्षेपाने संतापलेल्या शिर्डीकरांनी मंगळवारी त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Crime on Shankarachar | शंकराचार्यावर गुन्हा

शंकराचार्यावर गुन्हा

>शिर्डी : साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असण्यावर द्वारकेच्या शंकराचार्यानी घेतलेल्या आक्षेपाने संतापलेल्या शिर्डीकरांनी मंगळवारी त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सर्वधर्मीयांच्या वतीने नितीन कोते यांनी शंकराचार्याच्या विरोधात तक्रार दाखल केली़ त्यानुसार शिर्डीचे पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्यावर धार्मिक भावनांचा अप्रचार करून तेढ निर्माण करणो, धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करणो अशा आशयाचा अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. शंकराचार्याच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सर्वधर्मीय शिर्डीकरांनी साईप्रतिमेची मिरवणूक काढली व घंटानाद केला. 

Web Title: Crime on Shankarachar