‘Hasan Mushrif यांच्याविरोधातील गुन्हा पुण्यात वर्ग कशासाठी?’ Kirit Somaiya यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:22 IST2021-10-14T12:21:43+5:302021-10-14T12:22:13+5:30
Hasan Mushrif News: मुरगूड पोलीस ठाण्यातील गुन्हा पुणे परिक्षेत्राच्या लाचलुचपत विभागात वर्ग करण्याची ठाकरे-पवारांची चलाखी चालणार नाही, असे भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी येथे सांगितले.

‘Hasan Mushrif यांच्याविरोधातील गुन्हा पुण्यात वर्ग कशासाठी?’ Kirit Somaiya यांचा सवाल
पुणे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ परिवारावर कोल्हापुरातील मुरगूड ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तेथेच कारवाई करा, मुरगूड पोलीस ठाण्यातील गुन्हा पुणे परिक्षेत्राच्या लाचलुचपत विभागात वर्ग करण्याची ठाकरे-पवारांची चलाखी चालणार नाही, असे भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी येथे सांगितले.
पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांची भेट घेऊन त्यांनी मागण्या सादर केल्या. या संदर्भातील पुरावे दिल्याचा दावाही त्यांनी केला.
जरंडेश्वर साखर कारखान्याची मालकी अजित पवार यांच्याकडेच आहे. कारखाना खरेदी करताना त्यांनी अनेक नियमांचे उल्लंघन केले. आता २४ कंपन्यांची नावे समोर आली आहेत. एकूण ५७ कंपन्या आहेत. बहिणींच्या घरावर धाडी पडल्या, कारण त्यांच्या नावावरच्याच कंपन्या यात आहेत, असा आरोप देखील सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत
केला.