शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महासभेत गदारोळ

By admin | Updated: March 10, 2015 04:12 IST

पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणी समस्येच्या मुद्द्यावरून महासभा तहकूब होऊनही पाणीपुरवठ्यात कोणतीच सुधारणा न झाल्याने त्याचे पडसाद

कल्याण : पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणी समस्येच्या मुद्द्यावरून महासभा तहकूब होऊनही पाणीपुरवठ्यात कोणतीच सुधारणा न झाल्याने त्याचे पडसाद सोमवारी केडीएमसीच्या महासभेत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले़ यावर पाणी जोडण्यांचे काम अंतिम टप्प्यात असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी २३ कर्मचारी तातडीने दिले जातील, अशी ग्वाही आयुक्त मधुकर अर्दड यांनी दिली.पूर्वेकडील नगरसेवकांनी पाणी समस्येचा विषय १८ फेब्रुवारीला महासभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या गदारोळानंतर महापौर कल्याणी पाटील यांनी जोपर्यंत पाणी प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत महासभा होणार नाही, असा पवित्रा घेत सभा तहकूब केली होती. दरम्यान सोमवारी बोलाविलेल्या सभेत हा विषय पुन्हा उपस्थित करण्यात आला. गेल्या महासभेत दिलेल्या आदेशाला २० दिवसांचा कालावधी होऊनही पाणीपुरवठ्यात कुठलीच सुधारणा झाली नसल्याकडे नगरसेविका माधुरी काळे यांनी लक्ष वेधले.पाणी वाढले नाही़ परंतु, जे कमी दाबाने उपलब्ध होते तेदेखील गढूळ असून पूर्वेत माणसे राहतात का जनावरे? असा सवाल माधुरी काळे यांनी केला. पाणीप्रश्न सुटणार नाही तोपर्यंत महासभा न घेण्याच्या आदेशाचा महापौरांना विसर पडला का? अशी विचारणादेखील या वेळी करण्यात आली. यावर संबंधित सभा ही तहकूब आहे़ नवीन सर्वसाधारण सभा घेतली जाणार नसल्याचा पवित्रा घेतल्याचे महापौर पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)