कोर्टालाच फसवलं ! प्रेयसीला पत्नी दाखवून त्याने घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 02:07 PM2017-08-14T14:07:31+5:302017-08-14T14:13:00+5:30

पत्नीपासून विभक्त होण्यासाठी विरारमध्ये राहणा-या एका इसमाने फॅमिली कोर्टात प्रेयसीला पत्नी दाखवून घटस्फोट घेतल्याचे एक अजब प्रकरण समोर आले आहे.  

Courtaachake fool! He took a wife to a lover and divorced him | कोर्टालाच फसवलं ! प्रेयसीला पत्नी दाखवून त्याने घेतला घटस्फोट

कोर्टालाच फसवलं ! प्रेयसीला पत्नी दाखवून त्याने घेतला घटस्फोट

Next
ठळक मुद्देपत्नीने देखभाल खर्च आणि संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी पतीला फॅमिली कोर्टात खेचले तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. अमित पंडित तिचा पती नसल्याची धक्कादायक बातमी समजली.

ठाणे, दि. 14 - पत्नीपासून विभक्त होण्यासाठी विरारमध्ये राहणा-या एका इसमाने फॅमिली कोर्टात प्रेयसीला पत्नी दाखवून घटस्फोट घेतल्याचे एक अजब प्रकरण समोर आले आहे.  पत्नीने देखभाल खर्च आणि संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी पतीला फॅमिली कोर्टात खेचले तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. विरार येथे राहणा-या तृप्तीचा अमित पंडित याच्याबरोबर विवाह झाला होता. पण पती-पत्नीच्या नात्यात वारंवार खटके उडत असल्याने तृप्तीने अखेर कोर्टाचे दरवाजे ठोठावले. 

न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर तृप्तीला अमित पंडित तिचा पती नसल्याची धक्कादायक बातमी समजली. हे कसे शक्य आहे असा प्रश्न तिला पडला. कोर्टाच्या नोंदीनुसार 2007 मध्येच तिने अमितपासून घटस्फोट घेतला होता. अधिक चौकशी केली असता अमित पंडितने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने हा बनावट घटस्फोट घडवून आणल्याचे समोर आले. खासगी कंपनीत अधिकारी असलेल्या 45 वर्षीय अमित पंडित विरोधात बीकेसी पोलीस स्थानकात बांद्रा फॅमिली कोर्टाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमित पंडितला अटक करण्याआधी पोलिसांनी बनावट कागदपत्रे मागितली आहेत. अमित पंडितचे दुस-या एका महिलेबरोबर प्रेमप्रकरण सुरु होते. ती न्यायालयात  अमित पंडितची पत्नी म्हणून हजर झाली व बनावट प्रतिज्ञापत्र सादर केले अशी माहिती बीकेसी पोलिसांनी दिली. कोर्टाने या प्रकरणी नुकतीच पोलीस तक्रार दाखल केली. पंडितची घटस्फोटाची याचिका अवघ्या सहा महिन्यात मंजूर झाली. घटस्फोटाआधी नाते तुटू नये यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून  समुपदेशनाची काही सत्रे होतात. 

न्यायालयाच्या निर्देशानुसार अमित आणि त्याची प्रेयसी दोघेही समुपदेशनाच्या सत्राला हजर राहिले व घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्याचे न्यायालयाला सांगितले. अखेर न्यायालयासमोर परस्परसहमतीने त्यांनी घटस्फोट घेतला अशी माहिती पोलिसांनी दिली. या खोटया घटस्फोटानंतर अमित पंडित तृप्ती आणि मुलांसोबत राहत होता. त्यांना या घटस्फोटाची काहीच कल्पना नव्हती. 

2015 मध्ये तृप्तीने घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज केला. त्यावेळी हा प्रकार सर्वप्रथम समोर आला. अमित पंडितने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीबरोबर घरात भांडण व्हायला लागली त्याचवेळी बाहेर प्रेम प्रकरण सुरु झाल्यानंतर अमितने हा गुन्हा केला अशी माहिती पोलिसांनी दिली. अमितला पत्नीपासून घटस्फोट हवा होता. त्याने मदत मागितली म्हणून त्याची खोटी पत्नी बनण्याचे नाटक केले असे सदर महिलेने 2015 मध्ये न्यायालयाला सांगितले. 

Web Title: Courtaachake fool! He took a wife to a lover and divorced him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.