शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

देशाच्या लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार व्हावा, सरसंघचालक Mohan Bhagwat यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 7:19 AM

Mohan Bhagwat News: परदेशातून होणारी घुसखोरी व इतर कारणांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन निर्माण होत आहे. हे असंतुलन देशासाठी घातक ठरू शकते व अनेक संकटे निर्माण होऊ शकतात.

नागपूर : परदेशातून होणारी घुसखोरी व इतर कारणांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन निर्माण होत आहे. हे असंतुलन देशासाठी घातक ठरू शकते व अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. पुढील ५० वर्षांचा विचार करून लोकसंख्या धोरण तयार झाले पाहिजे व ते सर्वांसाठीच लागू करायला हवे, असेही डॉ. मोहन भागवत यांनी बोलून दाखविले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शस्त्रपूजन व विजयादशमी समारंभात ते शुक्रवारी बोलत होते.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आज देशाच्या सीमांवर जास्त संकट आहे. चीन व पाकिस्तानच्या सीमा सुरक्षेवर आणखी भर देण्याची गरज आहे. शिवाय समुद्री सीमादेखील बळकट व्हायला हव्यात, असे सरसंघचालक डॉ. भागवत यांनी नमूद केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सायबर सुरक्षेसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. देशांतर्गत उपद्रवी लोकांवरदेखील नियंत्रण आणले पाहिजे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशत प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादी हिंदू समाजाला लक्ष्य करत आहेत. त्यांच्या कारवायांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.मंदिर व्यवस्थापन हिंदूंकडे द्याहिंदुंच्या मंदिरांची स्थिती फारशी चांगली नाही. दक्षिणेतील मोठी मंदिरे तेथील राज्य सरकारांच्या अखत्यारित आहेत. या व्यवस्थेतून अक्षरश: लूट सुरू आहे. मंदिराचे मालक देव असून पुजारी व्यवस्थापक आहेत, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयदेखील आहे. त्यामुळे मंदिरांचे व्यवस्थापन परत हिंदुंकडे द्यावे, असे आग्रही प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी  केले. 

सरसंघचालकांच्या भाषणातील ठळक मुद्दे- ओटीटीमुळे नवीन पिढीवर वाईट संस्कार होत आहे. त्यावर नियंत्रण हवे.- समाजातील भेद वाढविण्याची भाषा वापरायला नको. संवाद कायमस्वरुपी सकारात्मकच असायला हवा.- मंदिर, पाणी, स्मशान सर्वांसाठी एकच असायला हवे.- देशात सर्वांपर्यंत सुलभ पध्दतीने वैद्यकीय उपचार पोहोचले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे.- कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता सर्वांचे हित साधणारी अर्थव्यवस्था हवी.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ