शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

देशाला जलस्वंयपूर्ण करणार  : जलशक्ती मंत्री गजेद्रंसिंग शेखावत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 19:20 IST

देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू

ठळक मुद्देपुण्यात शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.त्यामुळे पुढील काळात जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण केले जाईल,असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केले.  जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पाअंतर्गत पुण्यात शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी शेखावत बोलत होते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, जलशक्तीचे सचिव यु. पी सिंग, जलसंसाधन विकासचे प्रधान सचिव आय. एस. चहाल, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे वरिष्ठ सहआयुक्त राकेश कश्यप, जलशक्ती मंत्रालयाचे प्रकल्प समन्वयक अखील कुमार, आँस्ट्रेलियन दूतावास टोनी हुबेर, दिपक कुमार, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक एन. व्ही. शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता वी.जी. रजपूत, राजेंद्र मोहिते, जल विज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द भगत आदी उपस्थित होते.शेखावत म्हणाले, पाण्याचा विषय लक्षात घेऊन  जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात आले असून त्यामुळे पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे. पाण्याशिवाय जीवन हे अशक्य आहे.बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे.देशात प्रदेशनिहाय पाण्याची स्थिती बदलत असून बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रात दिवाळीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.  देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू असून मार्च 2020 पर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण होणार आहे.तसेच उर्वरित काम दोन वर्षात पुर्ण होईल,असे नमूद करून शेखावत म्हणाले, येत्या 2024 पर्यंत शासनाने घराघरांत पिण्याचे पाणी देण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. शेतीखालील पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक सिंचनाला महत्व दिले आहे. त्यावर शासन काम करत आहे.तसेच पाणी हा विषय फक्त राज्याचा राहिला नाही.यावेळी टोनी हुबेर,यु. पी सिंग यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.प्रधान सचिव आय. एस. चहाल यांनी प्रास्तविक केले. तर खलील अन्सारी यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीIndiaभारत