शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मालमत्तेच्या एक लाखावर मोजण्या राज्यात रखडल्या; कर्मचाऱ्यांची वानवा, साहित्याचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 09:00 IST

विशेष म्हणजे, अर्ज दाखल झाल्यानंतर महिनाभरात करावयाच्या अतितातडीच्या मोजण्याही लांबणीवर पडत आहेत. सर्वाधिक मोजण्या पुणे विभागात प्रलंबित असून सर्वात कमी औरंगाबाद विभागात आहेत.

यवतमाळ : कर्मचाऱ्यांची वानवा, साहित्याचा तुटवडा आदी कारणांमुळे राज्यातील सहा विभागांमध्ये शेती, प्लॉट, घराच्या एक लाख सात हजार ८०० मोजण्या रखडल्या आहेत. विशेष म्हणजे, अर्ज दाखल झाल्यानंतर महिनाभरात करावयाच्या अतितातडीच्या मोजण्याही लांबणीवर पडत आहेत. सर्वाधिक मोजण्या पुणे विभागात प्रलंबित असून सर्वात कमी औरंगाबाद विभागात आहेत.

भूमी अभिलेख विभागात सर्वेअरची ४,५०० पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २,५०० जणांवर काम भागवले जात आहे. दीर्घ काळापासून १,५०० जागा रिक्त आहेत. अलीकडे ५००हून अधिक सर्वेअरच्या पदोन्नत्या झाल्या. कर्मचारी तुटवड्याचा परिणाम मोजणीच्या कामावर झाला आहे. साधारणत: नोव्हेंबरपासून मोजणीच्या कामाला गती दिली जाते. परंतु, या काळात ड्रोन सर्वेक्षणाची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश यंत्रणा ड्रोन सर्वेक्षणासाठी वापरण्यात आली. त्यामुळे या काळात मोजण्या रखडल्या. 

मोजणीच्या साहित्याचाही तुटवडा आहे. गरजेइतकीच प्लेन टेबल, सर्वेअरच्या प्रमाणात इटीएस मशीन नाहीत. परिणामी या विभागात साधारण मोजणीचे अर्ज तर अमर्याद कालावधीसाठी पडून राहात आहेत.

१,२०० पदांची भरती थांबलीभूमी अभिलेख विभागात १,२०० विविध पदे भरण्याची प्रक्रिया वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आली. यावर अजून तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. वर्ग तीनमधील पदसमूह चारचा या पदभरतीत समावेश होता. या जागा भरल्या नसल्याने विभागापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. 

सर्व्हेअरच्या अडचणीसर्व्हेअरना आता दरमहा २५ ते ३० मोजण्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे. नियमित १२ ते १५ एवढ्याच मोजण्या कराव्या लागतात. त्यामुळे वाढलेली कामे पूर्ण न झाल्यास कारणे दाखवा, शिस्तभंग, वेतनवाढ रोखणे आदी कारवायांचा सामना सर्वेअरना करावा लागत आहे. सर्व्हेअरला लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला नाही. प्रत्यक्षात २,५०० सर्वेअर काम करत असताना काही महिन्यांपूर्वी ८०० लॅपटॉप उपलब्ध करून दिले.

अपुऱ्या संख्येमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्यांना शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. तसेच काम कमी झाल्यास कारवाईही केली जाते. या अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल.- श्रीराम खिरेकर, सरचिटणीस, विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना.

अशा रखडल्या मोजण्या    विभाग    संख्या१. पुणे विभाग    ४६,०००२. नागपूर विभाग    १२,०००३. नाशिक विभाग    १२,०००४. औरंगाबाद विभाग    १०,०००५. अमरावती विभाग    १५,६०० ६. मुंबई विभाग    ११,५००

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र