शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Coronavirus : ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 07:34 IST

Aditya Thackeray : कोविड प्रतिबंधक नियम मोडणाऱ्या आस्थापनाही सील करण्यात येतील, असा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई : मागच्या आठवड्यापासून ओमायक्रॉन व कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे. मात्र या बाधितांपैकी प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तरी ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. तसेच कोविड प्रतिबंधक नियम मोडणाऱ्या आस्थापनाही सील करण्यात येतील, असा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने पालिकेकडून सुरू असलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा आदित्य यांनी बुधवारी घेतला. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. पण घाबरण्याची गरज नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका. ओमायक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. तशी निरीक्षणेदेखील दिसत आहेत. पण ते तसेच राहील का, यावर सविस्तर संशोधन झाले नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

नियम मोडणारी कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट सील करणार...नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांवर बंदी आणण्यात आली आहे. तर, आस्थापनांनी नियम न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. बंदिस्त ठिकाणच्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्यात येणार असून नियमबाह्यता आढळल्यास ते ठिकाण सील करण्यात येईल, अशी ताकीद मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. हॉटेल आणि रेस्टाॅरंटमध्ये नियमांचे पालन होत आहे का, याची पाहणी करण्यासाठी विशेष पथकही तैनात असेल, असेही त्यांनी सांगितले. कोविड रुग्णांसाठी ५४ हजार खाटा तयार आहेत. ३१ डिसेंबरला इमारतींच्या गच्चीवर, संकुलातील मोकळ्या जागेतही पार्ट्या होतात. यावर बंदी नाही. मात्र, त्यांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

शाळा, कॉलेजचा निर्णय पुढच्या आठवड्यात... शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ३ तारखेपासून लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच बूस्टर डोसचे नियोजनदेखील सुरू आहे. शाळा-  महाविद्यालय सुरू ठेवण्याबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन