शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या गाड्यांचा राजकारण्यांना लाभ!

By admin | Updated: August 7, 2015 01:26 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या पैशातून कोट्यवधी रुपये किमतीच्या ६४ गाड्यांचे नियमबाह्ण वाटप करण्यात आले. त्यात काही सामाजिक

यदु जोशी, मुंबईलोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या पैशातून कोट्यवधी रुपये किमतीच्या ६४ गाड्यांचे नियमबाह्ण वाटप करण्यात आले. त्यात काही सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपा नेत्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे. वार्षिक एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी वाहने कर्जाऊ देण्याची महामंडळाची योजना आहे. या योजनेचे नियम/निकष धाब्यावर बसवून रमेश कदम महामंडळाचा अध्यक्ष असताना ६४ गाड्या वाटण्यात आल्या. त्यासाठी कोणतेही कर्जप्रकरण करण्यात आली नाहीत. कराड येथील एका प्राध्यापक महोदयांना इनोव्हा गाडी देण्यात आली. रमेश कदमचे जवळचे असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या दिमतीला असलेली एक इनोव्हा गाडी महामंडळाच्या पैशातूनच घेण्यात आली होती. ती आता पोलिसांना परत करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्णातील राष्ट्रवादीचे एक माजी राज्यमंत्री रमेश कदमच्या कृपेने दुसऱ्याच्या नावावर मिळालेली गाडी दोन वर्षे वापरत होते. चार दिवसांपूर्वी या गाडीचे २० लाख रुपये महामंडळात जमा करण्यात आले. लातूर जिल्ह्णातील भाजपाचे माजी आमदार टी.पी.कांबळे यांचे पुत्र राजू कांबळे यांना इनोव्हा गाडी मिळाली. टी.पी.कांबळेंच्या दुसऱ्या मुलाला ट्रॅक्टर मिळाले. तिसरे पुत्र संजय हे महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक आहेत. महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले की, कांबळे यांना देण्यात आलेल्या गाडीबाबत विभागीय व्यवस्थापकांचा चौकशी अहवाल आमच्याकडे आला असून ही गाडी नियमबाह्ण पद्धतीने दिल्याचे त्यात म्हटले आहे. याच अहवालात ट्रॅक्टरबाबतचाही उल्लेख आहे. टी.पी.कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आपल्या मुलांना नियमानुसारच वाहने मिळाल्याचा दावा केला.महामंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांमधून आरटीजीएस आणि बेअरर चेकद्वारे ८६ कोटी रुपये काढण्यात आले असून ही अख्खी रक्कम गायब असल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिले होते. त्यानुसार या सहा जिल्ह्णांमधील अधिकारी़/ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महागाई भत्ताही हडपसाठे महामंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची २ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी द्यावयाची होती. कदमचा विश्वासू आणि त्याचा पीए विजय कसबे याने कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यातील १ कोटी २ लाख रुपये वसूल केले, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.८० लाखांचा भूखंड १८ लाखांत दिला कसा?महामंडळाच्या मालकीचा असलेला नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील भूखंडाची किंमत ६८ लाख रुपये होती. त्यावर संरक्षक भिंतीसह १२ लाख रुपयांची कामे महामंडळाने केलेली होती. ८० लाख रुपयांचा हा भूखंड व्हिजन टेक एंटरप्रायजेसला केवळ १८ लाख रुपयात विकण्यात आला. विशेष म्हणजे हे १८ लाख रुपयेही महामंडळातूनच देण्यात आले. आता हा भूखंड महामंडळाला परत मिळावा यासाठी महामंडळ न्यायालयात धाव घेणार आहे.