शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळ नियुक्त्यांचे वारे; महायुतीची समन्वय बैठक, भाजपला आताच नकोय....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 07:52 IST

महामंडळांवरील नियुक्त्या आताच करू नयेत असे भाजपचे मत आहे; पण त्या आताच कराव्यात यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्यातील विविध महामंडळांवर महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते, प्रमुख कार्यकर्ते यांची नियुक्ती करण्यासंदर्भातील चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या नियुक्त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच होतील असे म्हटले जात असताना तीन पक्षांच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष  खा. सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, समन्वयक आशिष कुलकर्णी हे मंत्रालयासमोरील देसाई यांच्या बंगल्यातील बैठकीला हजर होते. 

महामंडळांवरील नियुक्त्या आताच करू नयेत असे भाजपचे मत आहे; पण त्या आताच कराव्यात यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले. तिन्ही पक्षांनी महामंडळांवरील नावांची आपापली यादी तयार करावी आणि नियुक्त्या आताच करायच्या की नंतर याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रित बसून करतील असे बैठकीत ठरल्याची माहिती  आहे.

आगामी निवडणुकांत शक्य तिथे महायुतीच खा. तटकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, महामंडळाच्या वाटपाबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. महायुतीच्या जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समित्या असाव्यात यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती म्हणूनच सामोरे जाण्याची भूमिका असेल, त्या दृष्टीने कसे पुढे जाता येईल, याबाबतही विचारविनिमय झाला.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस