शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus मरकजला परवानगी दिली कोणी? राज्याचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 06:44 IST

दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात हा धागा पकडून महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच मरकजबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्लीतील तबलिगीच्या मरकजमधील आयोजनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का दिली? या मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव सर्व राज्यात झाला त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मध्यरात्रीनंतर २ वाजता या मरकजमध्ये का गेले होते?, असे सवाल करीत गृहमंत्री अनिलदेशमुख यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात हा धागा पकडून महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच मरकजबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशमुख यांनी बुधवारी एक पत्रक प्रसिद्धीला दिले, त्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित करीत मरकजबाबत केंद्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभेकेले. मुंबईनजीकच्या वसई येथे तबलिगीचे संमेलन होणार होते. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याला परवानगी नाकारुन ते रोखले.

बैठकीनंतर गायब कसे?याच मरकजमध्ये रात्री २ वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तबलिगीचे पुढारी मौलाना साहेब हे कोणती गुप्त चर्चा करत होते? डोवाल आणि दिल्लीचे पोलीस आयुक्तया दोघांनीही या विषयावर बोलायचे का टाळले आहे, असे मुद्दे देशमुख यांनी मांडले. तबलिगीचे नेते मौलाना साहेब हे अजित डोवाल यांच्याशी भेट झाल्यानंतर लगेच दुसºया दिवशी गायब झाले. ते अद्याप फरार असून या संपूर्ण प्रकरणात केंद्राचे सारेच वर्तन संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.तबलिगींमुळे कोरोनाचा फैलाव वाढल्याने जनक्षोभ आहे. यावरून लक्ष वळविण्यासाठी देशमुख हे केंद्रावरबिनबुडाचे आरोप करीत आहेत.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेकेंद्राने राज्य सरकारचा आरोप फेटाळलानवी दिल्ली: तबलिगी जमातच्या दिल्लीतील निझामुद्दीनस्थित मुख्यालयात आयोजित परिषदेच्या वादात न अडकता केंद्र सरकारने महाराष्टÑ सरकारचे आरोप फेटाळून लावत दिल्ली सरकारलाच हे प्रकरण हाताळले पाहिजे होते, असे स्पष्ट केले.याबाबत दिल्ली सरकारचे म्हणणे आहे की, ही परिषद निझामुद्दीन भागातील स्वत:च्या इमारतीमध्ये घेतली होती. त्यामुळे परवानगीची गरज नव्हती.केंद्रीय गृहमंत्रालयाचा संबंध विदेशातून विविध प्रकारच्या व्हिसावर भारतात आलेल्या व्यक्तींशीसंबंधितच येतो. अशा परिषदांच्या आयोजकांमार्फत नोंदणी केलेल्या विदेशी व्यक्तींच्या नोंदवहीच्या माध्यमातून गृहमंत्रालय विशेष पोलिस शाखेमार्फत लक्ष ठेवते, या परिषदेसाठी पोलिसांकडून परवानगी घेण्याची गरज नसल्याने परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही.या वादात न अडकता केंद्राने महाराष्टÑ सरकारवर उलट निशाणा साधला. तबलिगी जमातला खुल्या जागेत परिषद घ्यायची असल्याने महाराष्टÑ सरकारने परवागी नाकारली, असे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या २७ व २८ फेब्रुवारी रोजी ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलग्रस्त भागांना भेट देणारे डोवाल हे खूपच वरिष्ठ अधिकारी होते. गृहमंत्री अमित शहा काही कारणांनी करू शकणार नव्हते म्हणून मोदी यांनी डोवाल यांच्याकडे ते काम दिले.

डोवालांच्या प्रयत्नांबाबत बोलण्यास नकार 

गृहमंत्रालयातील सूत्रांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मरकजचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. तथापि, पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांसाठी विशेषत: अल्पसंख्याकांशी संबंधित गुंतागुंतीचे विषय असतात तेव्हा ते हाताळण्यासाठी डोवाल हे नेहमीच पडद्यामागे भूमिका बजावत असतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये अल्पसंख्यांकांची मने जिंकणे गरजेचे होते तेव्हा अजित डोवाल यांना तेथेच मुक्कामी राहून तीन दिवसांचा व्यापक वैयक्तिक दौरा करण्याची जबाबदारी दिली गेली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुख