Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:08 PM2021-06-10T22:08:15+5:302021-06-10T22:09:34+5:30

Coronavirus In Maharashtra : गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली वाढ. ३९३ रुग्णांचा मृत्यू.

Coronavirus Update Slight increase in the number of coronavirus patients in the state 12207 coronavirus patients found in 24 hours | Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद

Next
ठळक मुद्दे गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली वाढ. ३९३ रुग्णांचा मृत्यू.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं राज्य सरकारनं निर्बंधात काही सूट दिली आहे. परंतु गेल्या चोवीस तासांमध्ये पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत थो़डी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात १२,२०७  नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात १२,२०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ११,४४९ कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या १,६०,६९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५.४५ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत ६६० रुग्णांची वाढ 

गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ७६८ रुग्णआंनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या १५,८११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही आता ५६६ दिवसांवर गेला आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus Update Slight increase in the number of coronavirus patients in the state 12207 coronavirus patients found in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app