Coronavirus Update : राज्यात ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 21:15 IST2021-04-29T21:14:33+5:302021-04-29T21:15:49+5:30
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्याच पुढे

Coronavirus Update : राज्यात ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थिथीत रुग्णसंख्या कमी व्हावी आणि साखळी तोडली जावी यासाठी राज्य सरकारनं निर्बंध घातले आहेत. आता ते निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीही गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या वरच दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ७७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
राज्यात गेल्या चोवीस तासांत ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असली तरी दुसरीकडे ६८,५३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३७,९९,२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,७०,३०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.६९ टक्क्यांवर आला आहे.
66,159 new cases, 771 deaths reported in Maharashtra in the last 24 hours; active cases 6,70,301 pic.twitter.com/APpuZ5D2We
— ANI (@ANI) April 29, 2021
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 29, 2021
२९ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण -४१९२
२४ तासात बरे झालेले रुग्ण-५६५०
बरे झालेले एकूण रुग्ण- ५६६०५१
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८८%
एकूण सक्रिय रुग्ण- ६४०१८
दुप्पटीचा दर- ७९ दिवस
कोविड वाढीचा दर (२२ एप्रिल-२८ एप्रिल)- ०.८६%#NaToCorona
मुंबईत ४ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण
मुंबई गेल्या चोवीस तासांमध्ये ४,१९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ५,६५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ५,६६,०५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ६४,०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही ७९ दिवसांवर गेला आहे.