Coronavirus Update : राज्यात ४,१४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 22:12 IST2021-09-08T22:10:19+5:302021-09-08T22:12:44+5:30
Coronavirus Update In Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर.

Coronavirus Update : राज्यात ४,१४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून सरकारही सावधतेनं पावलं उचलताना दिसत आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमदेखील राबवली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ४ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ४,१७४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे राज्यात ४,१५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ८ हजार ४९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.०९ टक्के इतरा झाला आहे. राज्यात सध्या ४७,८८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 8, 2021
८ सप्टेंबर, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ५३०
२४ तासात बरे झालेले रुग्ण -३४९
बरे झालेले एकूण रुग्ण-७२५२४७
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण-३८९५
दुप्पटीचा दर-१२५३ दिवस
कोविड वाढीचा दर (१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर)-०.०६%#NaToCorona
मुंबईत रुग्णसंख्या वाढली
मुंबईत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ५३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ३,८९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी आता १२५३ दिवस इतका झाला आहे.