Unlock: राज्यात दिवाळीपूर्वी संपूर्ण अनलॉक! वाचा काय सुरु अन् काय बंद राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 02:55 AM2020-10-11T02:55:39+5:302020-10-11T06:51:42+5:30

Coronavirus, Maharashtra unlock News:अनलॉक-५ मध्ये चार लाख रेस्टॉरंट-बार, रेल्वे सुरू झाली. नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले.

Coronavirus Unlock: Complete unlock before Diwali in the state! Places of worship says Rajesh tope | Unlock: राज्यात दिवाळीपूर्वी संपूर्ण अनलॉक! वाचा काय सुरु अन् काय बंद राहणार?

Unlock: राज्यात दिवाळीपूर्वी संपूर्ण अनलॉक! वाचा काय सुरु अन् काय बंद राहणार?

Next

अहमदनगर/मुंबई : लॉकडाऊनचा विषय आता राहिलेला नाही. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील. काही बाबी आॅक्टोबरअखेरपर्यंत अनलॉक होतील. दिवाळीपूर्वी वा नोव्हेंबरअखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करू या, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अहमदनगर येथे सांगितले.

अनलॉक-५ मध्ये चार लाख रेस्टॉरंट-बार, रेल्वे सुरू झाली. नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले. कोरोनाची साथ पुन्हा वेगाने आलीच तर राज्यातील आरोग्य यंत्रणा तेवढी पुरेशी नसेल. एकाचवेळी सर्वच अनलॉक करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री अनलॉकच्या निर्णयाबाबत जपून पावले टाकत आहेत. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व निर्णय राज्य सरकार घेत आहे. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री

काय काय सुरू होणार?
लोकल रेल्वे सेवा
सर्व धार्मिक स्थळे
व्यायामशाळा
जलतरण तलाव
सिनेमा आणि नाट्यगृहे
परराज्यातील रेल्वे सेवा

काय बंद राहणार?
शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस दिवाळीनंतरच सुरू होणार
राजकीय, धार्मिक आणि सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम

सध्या कशाला परवानगी आहे?
अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी. राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही अनलॉक-५ मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे. ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत.

Web Title: Coronavirus Unlock: Complete unlock before Diwali in the state! Places of worship says Rajesh tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.