Coronavirus: राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमॅट्रिक हजेरीला तात्पुरती स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 02:34 PM2020-03-16T14:34:51+5:302020-03-16T14:43:26+5:30

सामान्य प्रशासन विभागानं आज याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

Coronavirus: Temporary suspension of biometric attendance at all offices in the state | Coronavirus: राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमॅट्रिक हजेरीला तात्पुरती स्थगिती

Coronavirus: राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमॅट्रिक हजेरीला तात्पुरती स्थगिती

Next

मुंबई: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमेट्रीक हजेरीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागानं आज याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. कार्यालयांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याचा संसर्ग होऊ नये या उद्देशानं बायोमेट्रीय पद्धत पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. या कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यालयांमधील उपस्थिती पूर्वीप्रमाणे हजेरीपटावर नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळ अधिवेशनात अनेक आमदारांनी बायोमेट्रीक पद्धती काही काळासाठी बंद करण्याची मागणी केली होती.

Web Title: Coronavirus: Temporary suspension of biometric attendance at all offices in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.