coronavirus: स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यापोटी राज्य सरकारने दिले एकूण ६७ कोटी १९ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:35 PM2020-05-21T14:35:38+5:302020-05-21T14:36:42+5:30

स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यापोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत ६७ कोटी १९ लाख ५५ हजार ४९० रुपये देण्यात आले आहेत.

Coronavirus: state government paid Rs 67.19 crore for the railway fare of migrant workers BKP | coronavirus: स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यापोटी राज्य सरकारने दिले एकूण ६७ कोटी १९ लाख रुपये

coronavirus: स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यापोटी राज्य सरकारने दिले एकूण ६७ कोटी १९ लाख रुपये

Next

मुंबई  -  स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती, त्यानंतर त्यांच्या रेल्वे भाड्याचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येईल असे म्हटले होते व पहिल्या टप्प्यात राज्यातील ३६ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ०७० रुपये जमा केले होते. आता सहा जिल्ह्यांना अतिरिक्त १२ कोटी ४४ लाख ०८ हजार ४२० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. म्हणजेच स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यापोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत ६७ कोटी १९ लाख ५५ हजार ४९० रुपये देण्यात आले आहेत. हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

सहा जिल्ह्यांना वाढीव निधी देण्यात आला आहे.  ज्या सहा जिल्ह्यांना वाढीव निधी देण्यात आला आहे ते जिल्हे खालीलप्रमाणे आहेत. मुंबई उपनगर जिल्हा- १० कोटी, अहमदनगर- ३० लाख, सातारा- ४९ लाख ६८ हजार ४२०, सांगली- ४४ लाख ४० हजार, सोलापूर- २० लाख, कोल्हापूर- १ कोटी.

Web Title: Coronavirus: state government paid Rs 67.19 crore for the railway fare of migrant workers BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.