Coronavirus: Shocking! In the stat 229 corona patients were found during the day and 25 died pnm | Coronavirus: धक्कादायक! राज्यात दिवसभरात कोरोनाचे २२९ रुग्ण आढळले तर २५ जणांचा मृत्यू

Coronavirus: धक्कादायक! राज्यात दिवसभरात कोरोनाचे २२९ रुग्ण आढळले तर २५ जणांचा मृत्यू

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. दिवसभरात कोरोनाचे २२९ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या १३६४ इतकी झाली आहे. तर दिवसभरात राज्यात २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी पुण्यात १४, मुंबईत ९ तर मालेगाव आणि रत्नागिरी येथील प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे. २५ मृतांपैकी १२ जण हे ६० वर्षावरील आहेत.

राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा तपशील
जिल्हा/मनपाबाधित रुग्णमृत्यू 
मुंबई ८७६५४
पुणे मनपा१८१२४
पिंपरी-चिंचवड मनपा१९
पुणे ग्रामीण
ठाणे मनपा २६
कल्याण-डोंबिवली मनपा३२
नवी मुंबई मनपा३१
मीरा भाईंदर
वसई-विरार मनपा११
पनवेल मनपा
ठाणे, पालघर ग्रामीणप्रत्येकी ३१(पालघर)
सातारा
सांगली२६
नागपूर मनपा१९
अहमदनगर मनपा१६
बुलढाणा११
अहमदनगर ग्रामीण
औरंगाबाद मनपा १६
लातूर मनपा
अकोला
मालेगाव
रत्नागिरी, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती मनपाप्रत्येकी ४२(अमरावती मनपा, रत्नागिरी)
कोल्हापूर मनपा

उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा-ग्रामीण, जळगाव मनपा-ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण

जालना, हिंगोली, वाशिम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग 

प्रत्येकी ११(जळगाव)
इतर राज्ये 
एकूण १३६४९७

 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तसेच १२५ कोरोनाबाधितांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती होम क्वारंटाईन तर ४ हजार ७३१ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

Web Title: Coronavirus: Shocking! In the stat 229 corona patients were found during the day and 25 died pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.