शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

CoronaVirus : धक्कादायक! राज्यात कोरोनाचे ८११ नवे रुग्ण, आतापर्यंतचे सर्वाधिक निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 21:18 IST

CoronaVirus : राज्यात शनिवारी ८११ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनावरील उपचारपद्धतींवर विविध प्रयोग होत आहे, आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटते आहे. मात्र असे असूनही राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. 

राज्यात शनिवारी ८११ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात २२ मृत्यूंची नोंद झाली असून ३२३ वर पोहोचली आहे. मुंबईतही २८१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ५ हजार ४९ झाली आहे. तर दिवसभरात मुंबईत १३ मृत्यू झाले असून मृत्यूंचा आकडा १९१ इतका झाला आहे.

राज्यात आज झालेल्या २२ मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ६ महिला आहेत. यात मुंबईतील १३, पुणे महानगरपालिकेतील चार, तर मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, धुळे आणि सोलापूर शहरात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात शनिवारी ११९ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, तर आजपर्यंत १०७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या राज्यात १ लाख २५ हजार ३९३ लोक घरगुती अलगीकरणात आहेत. तर ८ हजार १२४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८ हजार ९७२ नमुन्यांपैकी १ लाख १ हजार १६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)मुंबई महानगरपालिका: ५०४९ (१९१)ठाणे: ७१७ (१५) पालघर: १३९ (४) रायगड: ५६ (१)मुंबई मंडळ एकूण: ५९६१ (२११)

नाशिक: १३१ (१२)अहमदनगर: ३५ (२)धुळे: २५ (३)जळगाव: १३ (२)नंदूरबार: ११ (१)नाशिक मंडळ एकूण: २१५ (२०)

पुणे: १०३० (७३)सोलापूर: ४६ (४)सातारा: २९ (२)पुणे मंडळ एकूण: ११०५ (७९)

कोल्हापूर: १०सांगली: २६ (१)सिंधुदुर्ग: १रत्नागिरी: ८ (१)कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)

औरंगाबाद: ५० (५)जालना: २हिंगोली: ७ परभणी: १ औरंगाबाद मंडळ एकूण: ६१ (५)

लातूर: ९उस्मानाबाद: ३ बीड: १नांदेड: १लातूर मंडळ एकूण: १४

अकोला: २३ (१)अमरावती: १९ (१)यवतमाळ: २८बुलढाणा: २१ (१)वाशिम: १ अकोला मंडळ एकूण: ९२ (३)

नागपूर: १०७ (१)वर्धा: ०भंडारा: ०गोंदिया: १चंद्रपूर: २गडचिरोली: ०नागपूर मंडळ एकूण: ११० (१)

इतर राज्ये: २५ (२)एकूण: ७६२८  (३२३)

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या  रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आय सी एम आर संकेतस्थळावरील माहिती जिल्हावार उपलब्ध असल्याने ती जिल्हावार सादर करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५५५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८१९४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ३१.४३ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र