शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

coronavirus: शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 08:46 IST

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री आणि भाजपाच्या काही आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता शिवसेनेचे एक आमदारही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

सिंधुदुर्ग - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या आणि सतत दौऱ्यांवर असणाऱ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री आणि भाजपाच्या काही आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता शिवसेनेचे एक आमदारही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या वैभव नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे उदभवलेल्या संकटकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक हे जिल्ह्यात सातत्याने दौरे करून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. संध्याकाळी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, वैभव नाईक यांनी गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी दौरे केले होते. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले होते. आता वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.  वैभव नाईक हे दोन वेळा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पराभवाचा धक्का दिला होता.

दरम्यान, राज्यात सोमवारी कोरोनाचे ८ हजार २४० रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १८ हजार ६९५ झाली असून मृतांचा आकडा १२ हजार ३० झाला आहे. राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यंत १ लाख ७५ हजार २९ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVaibhav Naikवैभव नाईक Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग