शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
3
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
4
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
5
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
6
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
7
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
8
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
9
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
10
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
11
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
12
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
13
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
15
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
16
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
17
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
18
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
19
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
20
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Coronavirus : जगानं वाभाडे काढले; कोकणातले, विदर्भातील पोपट आता शांत का?; अरविंद सावंत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 4:31 PM

कोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू, सावंत यांचं वक्तव्य

ठळक मुद्देकोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू, सावंत यांचं वक्तव्य कोकणातले पोपट, विदर्भातले पोपट सगळे शांत आहेत, सावंत यांचा टोला

सध्या देशात कोरोनाच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवांवर मोठा ताण पडत आहे. अनेक देशांनी भारताकडे आता मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु काही परदेशातील माध्यमांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून टीकाही केली होती. यावर तसंच निवडणुकीच्या निकालावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केलं. "देशाची मलीन झालेली प्रतीमा पुन्हा चांगली करणं कठिण होईल. जगानं वाभाडे काढले. म्हणूनच सर्व शांत आहे. कोकणातले पोपट, विदर्भातले पोपट सगळे शांत आहेत, असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला.

"काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं मी एकरकमी पैसे द्यायला तयार आहे मला १२ कोटी लसी द्या. आम्ही बाजारातून खरेदी करतो त्याला परवानगी द्या असंही ते म्हणाले. आता तुम्ही करताय पण सर्वात पहिल्यांदा लष्कराची मदत घेऊन ऑक्सिजनची वाहतूक करा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तेदेखील ऐकलं नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं. चांगल्या सूचना आल्या की त्या स्वीकारून पुढे जावं. त्यांचे इथले पोपट राज्यावर तुटून पडत होते त्यांना आता केंद्राकडे जाऊन या तुमच्या त्रुटी आहेत असं सांगण्याची हिंमत आहे का? आता बिळात लपून बसलेत सगळे," असं म्हणत सावंत यांनी केंद्रावर निशाणा साधला. एका मराठी वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "लसीकरणातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. परंतु दुर्देवानं कोरोनाबाधितांच्या संख्येतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. मुंबईतील संख्या आता कमी होतेय आणि ती अजून कमी व्हायला हवी. लॉकडाऊन लावताना जे सर्व पोपट काही गोष्टी सुरू करण्याची भाषा करत होते त्यांना आता पुढे भारतात फिरणंही मुश्किल होईल. किती गोष्टी लपवणार?" असा सवालही त्यांनी केला. जिंकणं आणि हरणं हा शेवटचा प्रश्न आहे. जगणं हा महत्त्वाचं आहे. यावेळी त्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. पंढरपुरात काहींना वाटतंय की देवळात जाऊ दिलं नाही. भाजपनं याठिकाणी लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं. त्याचा हा परिणाम दिसत असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितलं.... म्हणूनच सर्व शांत"देशाची मलीन झालेली प्रतीमा पुन्हा चांगली करणं कठिण होईल. जगानं वाभाडे काढले. म्हणूनच सर्व शांत आहे. कोकणातले पोपट, विदर्भातले पोपट सगळे शांत आहेत. असं काही झालं तरी आम्हाला आनंद नाही होत. आमच्या देशाचे पंतप्रधान आहे. कोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू,"असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंत