शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भयावह! दुसऱ्या लाटेत राज्यातील आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यांत मृत्युसंख्येत तब्बल चारपट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 10:41 IST

Coronavirus In Maharashtra: राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.२०२० च्या नऊ महिन्यांच्या तुलनेत कोरोनाने २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यांतच कितीतरी अधिक बळी घेतले आहेत.विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत बाधितांची संख्या ९०२० होती आणि १०२ मृत्यू झाले होते व मृत्युदर १.१३ टक्के होता. दुसऱ्या लाटेत १९,९६९ रुग्ण  निघाले आणि ६०२ मृत्युंसह मृत्युदर ३.०१ वर पोहोचला. गोंदिया आणि चंद्रपूर या इतर दोन आदिवासीबहुल जिल्ह्यांतही मृत्युदर वाढला असून अमरावती जिल्ह्यात मृत्यू दुपटीहून अधिक वाढले तरी बाधितांची संख्या अधिक असल्याने दर मात्र कमी दिसतो.उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये पहिल्या लाटेत ८७०३ रुग्ण होते. त्यापैकी २९५ जणांचा मृत्यू झाला व मृत्युदर २.२४ टक्के होता, तर दुसऱ्या लाटेत २८५८० रुग्ण असून मृत्यू ६१० झाले व मृत्युदर २.१३ टक्के आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाब‌ळी दुपटीहून अधिक वाढले आणि मृत्यूदरही जवळपास पहिल्या लाटेइतकाच आहे. आश्चर्य म्हणजे, मुंबईच्या पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात मात्र, दुसऱ्या लाटेत मृत्यू आणि मृत्यूदर दोन्ही कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. 

का वाढले मृत्यू?दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त. होम आयसोलेशनमधील रुग्णांची प्रकृती बिघडून ते अत्यवस्थ झाले.पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदी केली होती. दुसऱ्या लाटेत ती परिस्थिती दिसली नाही.ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा याबाबतच्या बातम्यांमुळे दहशत पसरली. त्या निगेटिव्ह भावनेने अनेकांना मृत्युने गाठले.लोक अंगावर दुखणे काढत होते. चाचणी उशिरा केल्याने उपचाराला खूप कमी वेळ मिळायचा. 

दुसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भाव वेगाने झाला. गंभीर रुग्ण वाढले. लक्षणे जाणवल्यानंतरही अनेकजण तपासणीला टाळाटाळ करतात. उशिराने रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले.    -डॉ. विपीन ईटणकर,     जिल्हाधिकारी, नांदेड. 

गैरसमजामुळे ग्रामीण भागातील लोक कोरोना टेस्ट करण्यासाठीही पुढे येत नव्हते. ग्रामीण भागासह जिल्हा मुख्यालयात सुसज्ज आरोग्य व्यवस्था असताना लोक रुग्णालयात भरती होण्यासाठी घाबरत होते. अनेक जण शेवटच्या क्षणी रुग्णालयात आल्याने ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नाही.    - दीपक सिंगला,     जिल्हाधिकारी, गडचिरोली

मराठवाडा : हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३५१६ रुग्ण आढळले आणि ५३ मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेत १२०४३ रुग्ण सापडले आणि २९७ बळी गेले. पहिल्या लाटेत १.५० टक्के असलेला मृत्यूदर दुसऱ्या लाटेत एकदम २.४६ टक्क्यांवर गेला. परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत कोरोनाबळी दुपटीहून अधिक वाढले, मात्र बाधितांची संख्या अधिक असल्याने दर घसरलेला दिसतो. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार