शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

CoronaVirus देशाच्या ४० टक्के भागात फैलाव; तरीही लॉकडाउन मागे घेण्यासाठी राज्यांचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 6:41 AM

केंद्र चिंतेत; तीन दिवसांत देशाच्या ४० टक्के भागात कोरोनाचा फैलाव

नवी दिल्ली : लॉकडाऊन १५ एप्रिलनंतर मागे घेण्याची मागणी राज्यांमागून राज्ये करत असले तरी केंद्र सरकार चिंतेत असून निर्बंध शिथील करण्याबाबत कमालीची काळजी घेत आहे. देशात ७१२ जिल्ह्यांपैकी कोविड-१९ चे जिल्हे २११ वरून २७४ झाले ते फक्त तीन दिवसांत. हा फैलाव देशात ४० टक्के भागात झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सचिवांच्या उच्चाधिकार समितीला लॉकडाऊनबाबत काय कृती करणार याचा अहवाल देण्यास सांगितले आहे. ११ एप्रिल रोजी या समितीची बैठक आहे. सरकारने अँटीबॉडी टेस्टस निवडलेल्या ४० हॉटस्पॉटसमध्ये बुधवारपासून घेण्यास परवानगी दिली आहे. यावरून लॉकडाऊन मागे घ्यावा की ठराविक ठिकाणेच निवडावी हे सरकार ठरवेल.

आरोग्य मंत्रालयाने २८ दिवसांसाठी हे हॉटस्पॉटस पूर्ण बंद करण्याची व मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी टेस्टस करण्याची सूचना केली आहे. पंतप्रधान मंत्रीगटाशी बुधवारी, आठ एप्रिल रोजी संसदीय पक्षांच्या नेत्यांशी तर मुख्यमंत्र्यांशी नऊ एप्रिलला व इतर सबंधितांशी रविवारी बैठका घेणार आहेत.

पंतप्रधान मोदींची नेत्यांशी चर्चादेशातील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील वेगवेगळ््या राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. नरेंद्र मोदी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि प्रतिभा पाटील व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा यांच्याशीही बोलले.

शाळा, कॉलेज उघडण्याचानिर्णय १४ एप्रिलनंतरचकोरोनामुळे बंद केलेली देशभरातील शाळा-कॉलेजे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलला संपल्यावर परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेऊनच केला जाऊ शकेल, असे केंद्रीय मानवसंधान विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांनी म्ह्टले आहे.ते म्हणाले की, सरकारच्या दृष्टीने विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा ही सर्वोच्च बाबआहे. १४ एप्रिलनंतरही शाळा-कॉलेजे बंद ठेवावी लागली तरी विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या