शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

Coronavirus : राज्यात निर्बंध तूर्त कायम राहणार; व्यापारी वर्गात निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 05:51 IST

Coronavirus Restrictions in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; व्यापारी वर्गात मोठी निराशा

ठळक मुद्देराज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.व्यापारी वर्गात मोठी निराशा.

कोरोना रुग्णवाढीचा वेग देशाच्या तुलनेत कमी असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका पाहता निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झालेला नाही. दुकाने, रेस्टॉरंटंची वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शाळा सुरू होण्यासाठीचा प्रोटोकॉल तयार नसल्याने त्या लगेच सुरू होतील अशी शक्यता नाही. मात्र १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही, असे ते म्हणाले. आठ दिवसांत डॉक्टरांच्या ८९९ जागा भरण्यात आल्या. पुढच्या काही दिवसांत १ हजार डॉक्टर भरले जातील. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्यावा अशी कुठलीही चर्चा बैठकीत झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्याची दररोज लसीकरण करण्याची क्षमता १० ते १५ लाख इतकी आहे. मात्र सध्या पाच दिवसांत ६ ते ७ लाख लसीच राज्याला मिळत आहेत. ऑगस्टपर्यंत राज्याला ४ कोटींपर्यंत लसीचे डोस उपलब्ध होणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून २५ टक्के लस घेता येऊ शकते. तो वाटा आपल्या राज्याला कसा जास्तीत जास्त मिळेल हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री लवकर याबाबत निर्णय घेतील, अशी मला अशा असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.

९३ टक्के रुग्ण १० जिल्ह्यांतमागील एक महिना ७ ते ८ हजारच्या घरात रुग्ण दररोज वाढत आहेत. राज्यातील ९३ टक्के रुग्ण १० जिल्ह्यांत आहेत. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये केवळ ८ टक्के रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, नगर, रायगड येथील रुग्णसंख्या वाढत असून, नियमांची काटेकोट अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

...अन्यथा टोकाची भूमिका घेऊ, व्यापाऱ्यांचा इशाराशासन व प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सर्व सनदशीर मार्गाने आमच्या व्यथा मांडूनही सरकारने निर्णय न घेणे व्यापार्‍यांवर अन्याय आहे. व्यापार्‍यांच्या पदरी निराशा आली असून व्यापार्‍यांच्या भावनांचा उद्रेक होऊन विस्फोट होण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिला. तिसरी लाट येईल म्हणून व्यापार किती काळ बंद ठेवणार? आता आणखी वाट बघणे शक्य नाही. ताबडतोब परवानगी द्या, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपेChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र