शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

Coronavirus: दिलासादायक! राज्यात कोरोना संक्रमणाच्या संख्येत घट; दिवसभरात ११८ नवीन रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 23:03 IST

आज राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे

मुंबई - आज राज्यात कोरोनाबाधीत ११८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३३२० झाली आहे. आज दिवसभरात ३१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६१ हजार ७४० नमुन्यांपैकी ५६ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३२०  जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७४ हजार ५८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ५, पुण्यातील २ जण  आहेत. त्यापैकी  ५  पुरुष तर  २  महिला आहेत. आज झालेल्या ७  मृत्यूपैकी ६ जण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत.  मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये ( ७१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०१ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २०८५ (१२२)

ठाणे: २९ (२)

ठाणे मनपा: ९६ (१)

नवी मुंबई मनपा: ६३ (३)

कल्याण डोंबवली मनपा: ६८ (२)

उल्हासनगर मनपा: १

भिवंडी निजामपूर मनपा: १

मीरा भाईंदर मनपा: ५३ (२)

पालघर: १४ (१)

वसई विरार मनपा: ६१ (३)

रायगड: ८

पनवेल मनपा: २८ (१)

ठाणे मंडळ एकूण: २५०७ (१३७)

नाशिक: ३

नाशिक मनपा: ५

मालेगाव मनपा:  ४५ (२)

अहमदनगर: १९ (१)

अहमदनगर मनपा: ९

धुळे: १ (१)

जळगाव मनपा: २ (१)

नाशिक मंडळ एकूण: ८४ (५)

पुणे: १७

पुणे मनपा: ४५० (४६)

पिंपरी चिंचवड मनपा: ३७ (१)

सोलापूर मनपा: १२ (१)

सातारा: ७ (२)

पुणे मंडळ एकूण: ५२३ (५०)

कोल्हापूर: २

कोल्हापूर मनपा: ३

सांगली: २६

सांगली मिरज कुपवाड मनपा:०

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ६ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ३८ (१)

औरंगाबाद मनपा: २८ (२)

जालना: २

हिंगोली: १

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ३२ (२)

लातूर: ८

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

लातूर मंडळ एकूण: १२

अकोला: ७ (१)

अकोला मनपा: ७

अमरावती मनपा: ५ (१)

यवतमाळ: १३

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ५४ (३)

नागपूर: २

नागपूर मनपा: ५५ (१)

गोंदिया: १

चंद्रपूर मनपा: २

नागपूर मंडळ एकूण: ६० (१)

इतर राज्ये: ११ (२)

एकूण:  ३३२० (२०१)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३३० कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५८५०  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी २०.५० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे