शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राज्यात दिवसभरात काेराेनाचे 39 हजारांहून अधिक रुग्ण, २४ तासांत २२७ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 06:54 IST

Coronavirus in Maharashtra : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे.

मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून, तीन लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.दिवसभरात २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्राण ८५.३४ टक्क्यांवर गेले असून, मृत्युदर १.९४ टक्के असल्याची नोंद आहे.नागपुरात लॉकडाऊन नाही, रात्रीचीच जमावबंदीनागपूर : नागपूर महानगर व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री आठनंतरची जमावबंदी सुरू राहील. मात्र, अन्य कुठलेही स्थानिक निर्बंध यापुढे राहणार नाहीत. बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशांचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री राऊत यांनी यावेळी केली.मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून, तीन लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.दिवसभरात २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्राण ८५.३४ टक्क्यांवर गेले असून, मृत्युदर १.९४ टक्के असल्याची नोंद आहे.मुंबईत रुग्ण दुपटीचा  कालावधी ४९ दिवसांवरमुंबईत बुधवारी ५ हजार ३९४ रुग्ण आढळले असून, १५ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख १४ हजार ७१४ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६८६ झाला आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २४ ते ३० मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३७ टक्के असल्याचे दिसून आले.  

परभणीतील संचारबंदीत पाच दिवसांची वाढपरभणी : विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्था आणि व्यापाऱ्यांतून संचारबंदीला होत असलेला विरोध झुगारून जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत आणखी पाच दिवसांची वाढ केली असून, आता ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठा बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर १५ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 

nमुंबईमृत्युदर - ०.३ टक्केमृत्यू - १५रुग्ण - ५३९४एकूण सक्रिय रुग्ण - ४९९५३nपुणेमृत्युदर - २.०१ टक्केमृत्यू - ३२रुग्ण - ४४५८एकूण सक्रिय रुग्ण - ३३८५८nपिंपरी-चिंचवडमृत्युदर - १.४२ टक्केमृत्यू - १५रुग्ण - २२८८एकूण सक्रिय रुग्ण - ३३२९nऔरंगाबादमृत्युदर - १.१० टक्केमृत्यू - १९रुग्ण - १५४२एकूण सक्रिय रुग्ण - १९४६६nनांदेडमृत्युदर - २.२२ टक्केमृत्यू - २४रुग्ण - १०७९एकूण सक्रिय रुग्ण - १०,१५७nजळगावमृत्युदर - १.८३ टक्केमृत्यू - १४रुग्ण - ११३९एकूण सक्रिय रुग्ण - ११८०३nनाशिकमृत्युदर - १.३३ टक्केमृत्यू - १८रुग्ण - ३३०८एकूण सक्रिय रुग्ण - २९३६६nनागपूरमृत्युदर - २.२५ टक्केमृत्यू - ५८रुग्ण - २,८८५एकूण सक्रिय रुग्ण - ३९,३३१nयवतमाळमृत्युदर - २.२७ टक्केमृत्यू - १०रुग्ण - ४४१एकूण सक्रिय रुग्ण - २४८९nकोल्हापूरमृत्युदर - १.५४ टक्केमृत्यू - ०रुग्ण - १०२एकूण सक्रिय रुग्ण - ७७३

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र