coronavirus: राज्यात दिवसभरात काेराेनाचे 39 हजारांहून अधिक रुग्ण, २४ तासांत २२७ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:54 AM2021-04-01T06:54:00+5:302021-04-01T06:54:25+5:30

Coronavirus in Maharashtra : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे.

coronavirus: Over 39,000 cases of coronavirus in the state in a day, 227 victims in 24 hours | coronavirus: राज्यात दिवसभरात काेराेनाचे 39 हजारांहून अधिक रुग्ण, २४ तासांत २२७ बळी

coronavirus: राज्यात दिवसभरात काेराेनाचे 39 हजारांहून अधिक रुग्ण, २४ तासांत २२७ बळी

Next

मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून, तीन लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
दिवसभरात २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्राण ८५.३४ टक्क्यांवर गेले असून, मृत्युदर १.९४ टक्के असल्याची नोंद आहे.

नागपुरात लॉकडाऊन नाही, रात्रीचीच जमावबंदी
नागपूर : नागपूर महानगर व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री आठनंतरची जमावबंदी सुरू राहील. मात्र, अन्य कुठलेही स्थानिक निर्बंध यापुढे राहणार नाहीत. बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशांचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री राऊत यांनी यावेळी 
केली.मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून, तीन लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
दिवसभरात २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्राण ८५.३४ टक्क्यांवर गेले असून, मृत्युदर १.९४ टक्के असल्याची नोंद आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा  कालावधी ४९ दिवसांवर
मुंबईत बुधवारी ५ हजार ३९४ रुग्ण आढळले असून, १५ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख १४ हजार ७१४ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६८६ झाला आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २४ ते ३० मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३७ टक्के असल्याचे दिसून आले.  

परभणीतील संचारबंदीत पाच दिवसांची वाढ
परभणी : विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्था आणि व्यापाऱ्यांतून संचारबंदीला होत असलेला विरोध झुगारून जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत आणखी पाच दिवसांची वाढ केली असून, आता ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठा बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर १५ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 

nमुंबई
मृत्युदर - ०.३ टक्के
मृत्यू - १५
रुग्ण - ५३९४
एकूण सक्रिय रुग्ण - ४९९५३
nपुणे
मृत्युदर - २.०१ टक्के
मृत्यू - ३२
रुग्ण - ४४५८
एकूण सक्रिय रुग्ण - ३३८५८
nपिंपरी-चिंचवड
मृत्युदर - १.४२ टक्के
मृत्यू - १५
रुग्ण - २२८८
एकूण सक्रिय रुग्ण - ३३२९
nऔरंगाबाद
मृत्युदर - १.१० टक्के
मृत्यू - १९
रुग्ण - १५४२
एकूण सक्रिय रुग्ण - १९४६६
nनांदेड
मृत्युदर - २.२२ टक्के
मृत्यू - २४
रुग्ण - १०७९
एकूण सक्रिय रुग्ण - १०,१५७
nजळगाव
मृत्युदर - १.८३ टक्के
मृत्यू - १४
रुग्ण - ११३९
एकूण सक्रिय रुग्ण - ११८०३
nनाशिक
मृत्युदर - १.३३ टक्के
मृत्यू - १८
रुग्ण - ३३०८
एकूण सक्रिय रुग्ण - २९३६६
nनागपूर
मृत्युदर - २.२५ टक्के
मृत्यू - ५८
रुग्ण - २,८८५
एकूण सक्रिय रुग्ण - ३९,३३१
nयवतमाळ
मृत्युदर - २.२७ टक्के
मृत्यू - १०
रुग्ण - ४४१
एकूण सक्रिय रुग्ण - २४८९
nकोल्हापूर
मृत्युदर - १.५४ टक्के
मृत्यू - ०
रुग्ण - १०२
एकूण सक्रिय रुग्ण - ७७३

Web Title: coronavirus: Over 39,000 cases of coronavirus in the state in a day, 227 victims in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.