CoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 07:11 PM2020-04-01T19:11:24+5:302020-04-01T19:14:14+5:30

गेले दोन दिवस कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५० च्या वर जात होता. काल राज्यात ७७ रुग्ण कोरोनाबाधीत आढळले होते.

CoronaVirus only 15 new corona patient found today in Maharashtra hrb | CoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट

CoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट

Next

मुंबई : कोरोनाबाधितांचे गेल्या दोन दिवसांचे आकडे पाहता राज्यासमोरील संकटामध्ये वाढ झाली होती. मात्र, आजचे राज्यात सापडलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा काहीसा हायसे वाटणार आहे. 

गेले दोन दिवस कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५० च्या वर जात होता. काल राज्यात ७७ रुग्ण कोरोनाबाधीत आढळले होते. तर सोमवारी मुंबई परिसरात ४९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. मात्र, मंगळवारच्या तुलनेत आजचा आकडा खूपच दिलासा देणारा आहे. आज राज्यभरात केवळ १५ रुग्ण कोरोनाबाधीत सापडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

यामुळे राज्यातील एकून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली असून मुंबईत १४ तर बुलढाण्यामध्ये १ रुग्ण सापडला आहे. दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातला गेलेल्या संभाव्य कोरोना बाधितांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास हा आकडा कमालीचा वाढण्याचा धोका आहे. 

केंद्र-राज्य व पालिकेत समन्वयाचा अभाव

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतोय, परिणामीराज्यातील यंत्रणांवरील दबावही वाढतोय. यामुळे कोरोनाच्या बाधित रुग्णांचीआकेडवारीत या तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे सातत्याने समोर येते आहे. याचाफटका मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला बसला आहे. कोरोनाची सर्व माहितीदररोजची व आतापर्यंतची आकडेवारी पालिका आऱोग्य विभाग  आणि राज्य शासनाच्या आऱोग्य विभागाकडून देण्यातयेत होती. मात्र त्यातील आकडेवारीमध्ये खूप तफावत आढळत होती. मंगळवारी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात भेट देऊन आढावा घेतला, त्यानंतर पालिकाआऱोग्य विभागाकडून येणाऱ्या तपशील रोखून यापुढे राज्य शासनाच्या आऱोग्य विभागाकडूनसर्व माहिती पुरविण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title: CoronaVirus only 15 new corona patient found today in Maharashtra hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.