Coronavirus: धोका वाढला! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजारांवर; दिवसभरात १५० रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 08:22 PM2020-04-07T20:22:26+5:302020-04-07T20:30:18+5:30

दरम्यान, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे

Coronavirus: The number of corona patient in the state is more than 1 thousand; 150 patients were found in one day pnm | Coronavirus: धोका वाढला! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजारांवर; दिवसभरात १५० रुग्ण आढळले

Coronavirus: धोका वाढला! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजारांवर; दिवसभरात १५० रुग्ण आढळले

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्यादिवसभरात मुंबईत ११६ रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६४२ पर्यंत पोहचली आहे

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. राज्यात आतापर्यंत १०१८ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून आज दिवसभरात राज्यात १५० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. आज दिवसभरात मुंबईत ११६ रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६४२ पर्यंत पोहचली आहे. तर पुणे १८, अहमदनगर ३, बुलढाणा २, ठाणे – २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ अशाप्रकारे १५० नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर आतापर्यंत राज्यात ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या १५९वर पोचली आहे. मंगळवारी शहरात नवे १७ रुग्ण आढळले असून सोमवारी ही संख्या ३७वर पोचली होती. त्यामुळे पुणेकरांनी आता अधिकाधिक काळजी घेण्याची गरज आहे. शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहारातील पूर्व भाग सील करण्यात आला आहे. उर्वरित शहरातही कडक नियम बनवण्यात आले असून कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.

त्याचसोबत कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले.  या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली. 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला. उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली.  त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरविण्यात आले. 

तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Web Title: Coronavirus: The number of corona patient in the state is more than 1 thousand; 150 patients were found in one day pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.