शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह तर तासाभरात दुसरा निगेटिव्ह! हा चमत्कार होतो कसा? नितेश राणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 14:10 IST

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आला नसला तरी मुंबई, ठाणे आणि पुण्याहून येत असलेल्या चाकरमान्यांमुळे येथील प्रशासनासमोर कोरोनाला रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

मुंबई/सिंधुदुर्ग - राज्यातील कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आला नसला तरी मुंबई, ठाणे आणि पुण्याहून येत असलेल्या चाकरमान्यांमुळे येथील प्रशासनासमोर कोरोनाला रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, काल सिंधुदुर्गात एका तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पहिल्यांदा पॉझिटिव्ह आणि नंतर तासाभरानंतर केलेली दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे भाजपा आमदार नितेश राणे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट करून या प्रकाराबाबत सवाल उपस्थित केला आहे. या सरकारवर कोण विश्वास ठेवणार, एका महिलेचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. त्यानंतर मग एका तासात हा रिपोर्ट निगेटिव्ह होतो, हा चमत्कार सिंधुदुर्गात होतो, असे सांगत नितेश राणे यांनी झाल्या प्रकारावर सवाल उपस्थित केला आहे.

सिंधुदुर्गात आतापर्यंत कोरोनाचे आठ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात एका तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त सोशल मीडियावरून पसरले. मात्र नंतर या तरुणीचा दुसरा चाचणी अहवाल हा निगेटिव्ह असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे