शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : काेराेना रुग्णांच्या नातेवाईकांची खाटांसाठी वणवण; नागपुरात भीषण स्थिती, रुग्ण पाठवले अमरावतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 07:05 IST

CoronaVirus News: नागपूरसह यवतमाळ, भंडारा, बुलडाणा, वर्धा, अकोला  आणि गोंदिया जिल्ह्यांत खाटांचा प्रश्न गंभीर होत चाललाय. वाशीम आणि चंद्रपूर काठावर आहेत.

नागपूर : विदर्भाच्या सात जिल्ह्यातील कोरोना स्थिती सध्या गंभीर वळणावर आहे. अत्यवस्थ आणि ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रुग्ण सातत्याने वाढत असल्याने खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘बेड देता का बेड’ असा टाहो फोडत रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयांची दारे ठोठावत आहेत. सर्वात आणिबाणीची स्थिती नागपुरात आहे. नागपुरात खाटा उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्ण अमरावतीत पाठवण्यात येत आहेत. नागपूरसह यवतमाळ, भंडारा, बुलडाणा, वर्धा, अकोला  आणि गोंदिया जिल्ह्यांत खाटांचा प्रश्न गंभीर होत चाललाय. वाशीम आणि चंद्रपूर काठावर आहेत.

अमरावतीचा नागपूरला आधार- फेब्रुवारी-मार्च महिन्यात स्फोट झालेला कोरोना संसर्गाचा आलेख आता घसरला आहे. सध्या विविध वर्गवारीतील ४० रुग्णालयांत २,८०६ बेडची संख्या आहे. - यामध्ये ९९७ बेड व्याप्त असल्याने १,८०७ बेड रिक्त आहेत. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतील रुग्ण येत आहेत. शनिवारी नागपूर येथून ३१ गंभीर रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागपुरनागपुरात रुग्णांना खाटांसाठी वणवण भटकावे लागत आहे. शासकीयच नव्हे तर खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा खाटांची कमतरता आहे. २५०० खाटा शासकीय रुग्णालयात तर खासगीमध्ये ३५०० खाटा आहेत. दररोज ५५० रुग्ण दाखल होत आहेत. रविवारी ५५ रुग्ण वेटिंगवर होते. त्यामुळे रुग्णांना अमरावतीला पाठविण्यात येत आहे. 

बुलडाणाशासकीय, खासगी मिळून ७,८३५ खाटा उपलब्ध आहेत. पैकी  १०५७ खाटा व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधेसह आहेत. अकोला, जालना, अैारंगाबाद आणि जळगावच्या सीमावर्ती गावातील रुग्ण बुलडाण्यात येतात. 

चंद्रपूर कोविड हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर व डेडिकेड कोविड सेंटरमध्ये १९३४ पैकी केवळ ५३० खाटा शिल्लक आहेत. प्रसार वेगाने वाढत असल्याने खाटांची स्थिती मोठी बिकट होऊ शकते. शासकीय रूग्णालयात कोविडसाठी १३५४ तर खासगी रूग्णालयात ५८० खाटा राखीव आहेत. रोज सुमारे २० गंभीर रूग्ण दाखल होतात. सुमारे ३५० रूग्ण बरे होऊन घरी जातात. 

वर्धा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात कोविडच्या ६०० खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयातील खाटा सध्या फुल्ल आहेत. दोन्ही रुग्णालयात रोज १०० हून अधिक गंभीर बाधित दाखल होतात.  वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, नांदेड येथून उपचारासाठी रुग्ण दाखल होतात.

वाशिम सद्यस्थितीत १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. खासगी कोविड हॉस्पिटलची संख्या वाढविल्याने तूर्तास तरी ऑक्सिजनच्या ३२५ व आयसीयूच्या ३६ खाटा उपलब्ध आहेत.

गडचिराेली सध्या १० रूग्णालयांमध्ये १ हजार १९३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सरकारी कोविड केअर रूग्णालयांमध्ये २ हजार ५४ खाटा उपलब्ध आहेत. दैनंदिन २०० च्या घरात नवीन रुग्णांचे प्रमाण असले तरी खाटांची कमरतरता नाही.

भंडाराजिल्ह्यात १२२५ खाटा आहेत. तालुका स्तरावर ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने सर्व रुग्ण भंडाराकडे धाव घेतात. जिल्हा रुग्णालयात ४२५ खाटांची क्षमता आहे. तेथे एकही खाट शनिवारी शिल्लक नव्हती. जिल्ह्यात खासगी रुग्णालयात ३२४ खाटांची सुविधा असून तेथे २९४ रुग्ण दाखल आहेत. २५० नवीन रुग्ण व शंभर काेराेनामुक्त असे व्यस्त प्रमाण असल्याने खाटांचा प्रश्न गंभीर झाला आहे. 

गोंदियादोन मोठ्या कोविड केअर सेंटर्समधील अर्धेअधिक बेड फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. संसर्गाचा वेग बघता येत्या काही दिवसात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. शासकीय रुग्णालयात ७१८ खाटा असून फक्त २४६ खाटा शिल्लक आहेत. आठ खासगी रुग्णालयातील सर्व ४५३ खाटा फुल्ल असून एकही खाट शिल्लक नाही. दररोज सरासरी ८० रुग्ण दाखल होत आहेत व ८५ जणांना सुटी दिली जात आहे. 

यवतमाळएक शासकीय, १७ खासगी कोविड रुग्णालये आहेत. गंभीर रुग्णांची संख्या जास्त असल्याने खाटांची कमतरता आहे. शासकीय रुग्णालयात ५७० खाटा आहेत. त्यातील गंभीर रुग्णांसाठीच्या खाटा फुल्ल आहेत. खासगी रुग्णालयात ५२१ खाटा आहेत. तेथे ३६९ रुग्ण उपचार घेत असून आयसीयू व ऑक्सिजन सुविधेचे बेड फुल्ल आहेत. रोज सरासरी दीडशे रुग्ण दाखल होतात. 

काय आहेत कारणे?गेल्या काही दिवसांपाूसन गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आयसीयू, ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटांची संख्या तुलनेने कमी आहे. गंभीर रुग्ण बरे होण्यास १५ ते २० दिवस लागतात. काही रुग्णांना महिनाही लागतो. नवे रुग्ण अधिक व बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे.आरटीपीसीआर न करता अनेक जण सिटीस्कॅनच्या आधारावर उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर