शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात सोमवारी ५२ हजार ३१२ रुग्ण कोरोनामुक्त; दिवसभरात २५८ मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 01:11 IST

CoronaVirus News in Maharashtra : आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३४ लाख ५८ हजार ९९६ असून, मृतांचा आकडा ५८ हजार २४५ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई : मुंबईप्रमाणे राज्यातही काहीसा वीकेंड लाॅकडाऊनचा परिणाम दिसून आला आहे. राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याने दिलासा मिळाला आहे. याखेरीज, ३००च्या घरात असणारे दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण २५८वर आले आहे. दिवसभरात ५१ हजार ७५१ रुग्णांचे निदान झाले आहे, तर मागील २४ तासांत ५२ हजार ३१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३४ लाख ५८ हजार ९९६ असून, मृतांचा आकडा ५८ हजार २४५ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात सोमवारी नोंद झालेल्या २५८ मृत्यूंमध्ये मुंबई ४३, ठाणे २, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा ४, मीरा भाईंदर मनपा २, पालघर १, वसई विरार मनपा ३, पनवेल मनपा ७, नाशिक ८, नाशिक मनपा १३, मालेगाव मनपा ३, अहमदनगर ७, अहमदनगर मनपा ८, धुळे १, धुळे मनपा ३, जळगाव ८, जळगाव मनपा ४, पुणे ३, पुणे मनपा २, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ४, सोलापूर मनपा ४, सातारा १०, कोल्हापूर १, सांगली ६, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ३ परभणी ३, परभणी मनपा १२, लातूर २, लातूर मनपा २, उस्मानाबाद ६, बीड ६, नांदेड ११, नांदेड मनपा ६, अकोला १, अकोला मनपा ६, , बुलढाणा २, नागपूर २, नागपूर मनपा ११, गोंदिया ८ , चंद्रपूर ९, चंद्रपूर मनपा ३ इ. समावेश आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.९४ टक्केराज्यात एकूण २८ लाख ३४ हजार ४७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.९४ टक्के झाले असून, मृत्युदर १.६८ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या दोन कोटी २३ लाख २२ हजार ३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.४९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३२ लाख ७५ हजार २२४ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर २९ हजार ३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र