शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

CoronaVirus News : दिलासा! कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले; दिवसभरात ७५३९ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 21:15 IST

CoronaVirus News : राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

ठळक मुद्देराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८. १ टक्क्यांवर पोहोचले आहे.आजपर्यंत एकूण १४,३१,८५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही  रुग्ण बरे होण्याऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना व आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७,५३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,२५,१९७ झाली आहे. तर राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यात १,५०,०११ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर आज राज्यात १६,१७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण १४,३१,८५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८. १ टक्क्यांवर पोहोचले आहे. याचबरोबर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४,०२,५५९ कोरोना चाचण्यांचा अहवाल १६,२५,१९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात २४,५९,४३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४९, ठाणे ७, नवी मुंबई २, उल्हासनगर महापालिका २, भिवंडी-निजामपूर मनपा २, मिरा-भाईंदर मनपा २, वसई-विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल मनपा ३, नाशिक ४, अहमदनगर १४, पुणे ११, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ११, सातारा १०, कोल्हापूर ६, सांगली ९, उस्मानाबाद ४, नागपूर २०, भंडारा ४ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र