CoronaVirus ncp chief sharad pawar helps with 1 thousand remdesivir injections | CoronaVirus News: ...अन् शरद पवार पुन्हा मदतीला धावले; कोरोना संकट काळात मोलाची मदत

CoronaVirus News: ...अन् शरद पवार पुन्हा मदतीला धावले; कोरोना संकट काळात मोलाची मदत

मुंबई: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपेंची भेट घेऊन शरद पवार यांनी तात्काळ १ हजार १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलं. राष्ट्रवादीकडून ट्विटरवर याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

देशातील कोरोनाची लाट ओसरतेय?; बघा, आकडेवारी काय सांगतेय

आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्यानं १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केल्याचं पवार यांनी टोपेंना सांगितलं. सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचना यावेळी शरद पवार यांनी राजेश टोपे यांना केली.देशातील जवळपास एक चतुर्थांश कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. काल दिवसभरात राज्यात १८ हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १२ लाख ४२ हजार ७७० वर पोहोचला. काल दिवसभरात ३९२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ३३ हजार ४०७ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात २ लाख ७२ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरू असून ९ लाख ३६ हजार ५५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान

मुंबईत काल १ हजार ६२८ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील बाधितांचा एकूण आकडा १ लाख ८७ हजार ९०४ वर पोहोचला आहे. काल दिवसभरात मुंबईत कोरोनामुळे ६० जण दगावले. शहरात आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या ८ हजार ५५५ झाली आहे. पुण्यात काल कोरोनाच्या १ हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील बाधितांचा आकडा १ लाख ४४ हजार २६५ वर गेला. काल दिवसभरात ४२ जण दगावले. त्यामुळे मृतांची संख्या ३ हजार ३०३ इतका झाला.

"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus ncp chief sharad pawar helps with 1 thousand remdesivir injections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.