Coronavirus : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची कोरोनावर मात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 08:04 IST2022-02-01T08:04:24+5:302022-02-01T08:04:48+5:30

Coronavirus : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पवार यांनी टि्वटरवरून दिली आहे. आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

Coronavirus: NCP chief Sharad Pawar defeats Coronavirus | Coronavirus : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची कोरोनावर मात  

Coronavirus : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची कोरोनावर मात  

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पवार यांनी टि्वटरवरून दिली आहे. आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 
माझी तब्येतदेखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो, असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे २४ जानेवारीला लक्षात आले होते. कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः पवार यांनी ट्विट करत दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
 

Web Title: Coronavirus: NCP chief Sharad Pawar defeats Coronavirus