CoronaVirus राज्यात दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; ६७८ रुग्णांचे निदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 21:55 IST2020-05-03T21:48:56+5:302020-05-03T21:55:27+5:30
एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा एकूण 8613 वर गेला असून मृत्यूंचा आकडा 343 वर पोहोचला आहे.

CoronaVirus राज्यात दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; ६७८ रुग्णांचे निदान
मुंबई : मुंबईतील कोरोना बाधितांची आकडेवारी आल्यानंतर आता राज्यातील कोरोना महामारीच्या परिस्थितीची आकडेवारी आली आहे. आज दिवसभरात ६७८ रुग्णांचे निदान झाले असून बाधितांची संख्या १२ हजार ९७४ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज ११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा एकूण 8613 वर गेला असून मृत्यूंचा आकडा 343 वर पोहोचला आहे. तर आजपर्यंत एकूण 1804 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ही आकडेवारी मुंबईतील आहे. नवी मुंबई मध्ये 25 रूग्ण वाढले; कोरोना बाधितांची संख्या 314 झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 74 नव्या रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात २७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण 548 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत २११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या ९९७ कंटेन्मेंट झोन असून ५१.०५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यात सध्या १,८१,३८२ लोकांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. तर १३,१५८ लोकांना संस्थात्मक क्वारन्टाईन करण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus in Mumbai मुंबईत दिवसभरात ४४१ रुग्णांचे निदान, २१ बळी
CoronaVirus वुहान लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार; पुरेसे पुरावे सापडल्याचा अमेरिकेचा दावा
खूशखबर! मोबाईल, लॅपटॉप ऑनलाईन खरेदी करता येणार; ई-कॉमर्सला मान्यता
कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट
आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप