Coronavirus Maharashtra Updates: दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट; २४ तासांत ५८ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:49 PM2021-05-12T19:49:52+5:302021-05-12T19:54:57+5:30

राज्यात आजपर्यंत एकूण ४६ लाख १९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Coronavirus Maharashtra Updates: In 24 hours, 58,000 patients recovered & found 46196 patients | Coronavirus Maharashtra Updates: दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट; २४ तासांत ५८ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले

Coronavirus Maharashtra Updates: दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट; २४ तासांत ५८ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले

Next
ठळक मुद्देसध्या राज्यात ३६ लाख १३ हजार ००० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेतराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.०१% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी  ०१ लाख ९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख २६ हजार ७१० (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ठाकरे सरकार चिंतेत होतं. परंतु रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात आज ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८१६ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं दिलासादायक चित्र समोर आलं आहे.  

राज्यात आजपर्यंत एकूण ४६ लाख १९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.०१% एवढे झाले आहे. राज्यात आज ८१६  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी  ०१ लाख ९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख २६ हजार ७१० (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३६ लाख १३ हजार व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ५ लाख ४६ हजार १२९ रुग्ण आहेत.

राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या खालीलप्रमाणे

मुंबई - ३६५९५

ठाणे – ३१३४७

पालघर – १५३१७

रत्नागिरी - १०३९४

पुणे - १०३०६७

सातारा - २४०८०

सांगली – १९९१२

कोल्हापूर – १८८६३

नाशिक – २२७८८

सोलापूर – २१४५५

अहमदनगर – २६२५६

जळगाव – ११६०१

नागपूर – ४९३४५

अमरावती – १०९०५

चंद्रपूर  १७६३९

आज राज्यात ४६ हजार ७८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ लाख २६ हजार ७१० झाली आहे.

सक्रीय रुग्णांची संख्या

मुंबई महानगरपालिका - २१०४

ठाणे - ५१२

ठाणे मनपा - ४१६

नवी मुंबई मनपा - २७३

कल्याण डोंबिवली – ५४१

ठाणे विभाग – ६८१८

नाशिक विभाग – ६४९४

पुणे विभाग – १२९०३

कोल्हापूर विभाग – ५०७३

औरंगाबाद विभाग – २१५९

लातूर विभाग – २९०८

अकोला विभाग – ५०४२

नागपूर – ५३८४

आज नोंद झालेल्या एकूण ८१६ मृत्यूंपैकी ३८७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे २३६ मृत्यू,  पुणे- ४६, नागपूर- २७, बीड- २२, नाशिक- २१, जालना- १६, नांदेड- ११, भंडारा- १०, अहमदनगर- ९, चंद्रपूर- ८, सोलापूर- ८, ठाणे- ८, औरंगाबाद- ५, रत्नागिरी- ५, वाशिम- ५, कोल्हापूर- ४, लातूर- ४, गोंदिया- ३, हिंगोली- ३, जळगाव- ३, पालघर- ३, सातारा- ३, गडचिरोली- २, उस्मानाबाद- २, परभणी- २, रायगड- २, अकोला- १, धुळे- १, सांगली- १ आणि सिंधुदुर्ग- १  असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus Maharashtra Updates: In 24 hours, 58,000 patients recovered & found 46196 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app