शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

Coronavirus: चिंता वाढली! महाराष्ट्रात दिवसभरात ६३ हजार २८२ कोरोनाबाधित तर ८०२ मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 8:43 PM

राज्यात आज मुंबईत ३८९७, ठाणे १९८३, नाशिक ५४१४, अहमदनगर ४००६, पुणे ८००७ इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

ठळक मुद्देआज नोंद झालेल्या एकूण ८०२ मृत्यूंपैकी ४३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची जबाबदारी केंद्राने राज्यावर दिली आहे. ती पेलण्यासाठी राज्य सरकार समर्थसायंकाळी सहा वाजेपर्यंत १८ वर्षावरील एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले

मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. राज्यात शनिवारी ६३ हजार २८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर दिवसभरात ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात २४ तासांत ६१ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ३९ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४.२४ टक्के एवढे झालं आहे.

राज्यात २४ तासांत ८०२  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ६३ हजार ७५८ इतकी आहे.

राज्यात आज मुंबईत ३८९७, ठाणे १९८३, नाशिक ५४१४, अहमदनगर ४००६, पुणे ८००७ इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण ८०२ मृत्यूंपैकी ४३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १८६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १८६ मृत्यू, पुणे-३८, औरंगाबाद-२७, नाशिक-२४, भंडारा-१९, नागपूर-१८, ठाणे-१७, चंद्रपूर-११, रायगड-६, सोलापूर-४, नांदेड-३, यवतमाळ-३, हिंगोली-२, जळगाव-२, जालना-२, नंदूरबार-२, परभणी-२, बीड-१, कोल्हापूर-१, उस्मानाबाद-१, पालघर-१, सातारा-१ आणि वर्धा-१ असे आहेत.

राज्यात १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी १२ कोटी डोस गरजेचे

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची जबाबदारी केंद्राने राज्यावर दिली आहे. ती पेलण्यासाठी राज्य सरकार समर्थ आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्याची तयारी आहे. १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ६ कोटी नागरिकांसाठी १२ कोटी लसींच्या डोसची गरज आहे. ते एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राने यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करून दिला तर लसीकरणाच्या माध्यमातून कोविडला मात केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

सहा वाजेपर्यंत ११ हजार लाभार्थ्यांना लस

राज्यात आज १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्ह्यांमध्ये  सुरुवात झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या दि. २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या