शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

CoronaVirus Updates Maharashtra: कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या तयारीत?; चाचपणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 19:06 IST

Coronavirus Maharashtra Lockdown News: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारची तयारी सुरू; हालचालींना वेग

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगानं वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. धुळवड आणि त्यानंतर एक दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली. मात्र त्यानंतर लगेचच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होईल की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कित्येकांना पगार कपात सहन करावी लागली. त्यामुळे जनतेचा लॉकडाऊनला विरोध आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारनं इतर पर्यायांचा विचार करत आहे.राज्यात कठोर निर्बंध लागणार; आगामी एक-दोन दिवसांत घोषणा करणार, राजेश टोपेंची माहितीजास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सोय उपलब्ध व्हावी याची चाचपणी राज्य सरकारनं सुरू केली आहे. लॉकडाऊन करण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना घरूनच काम कसं काम करता येईल या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना तसे आदेश देण्याची शक्यता आहे. नागरिक घरी राहिल्यानं रस्त्यावरची गर्दी कमी होईल. ट्रेन, बस आणि मेट्रोमध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असा सरकारचा विचार आहे. त्यासाठी वर्क फ्रॉम होमकडे सरकारनं विशेष लक्ष दिलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना सरकार वर्क फ्रॉम होमसाठी आदेश देणार असल्याची चर्चा आहे.मोठा दिलासा! आता ५०० रुपयांत होणार कोरोनाची  'RTPCR' चाचणी; राजेश टोपेंची घोषणा

राज्यात पुन्हा लॉकडाऊन?राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.

लॉकडाऊन करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र याबाबत सरकारची चर्चा सुरु आहे. त्यामुळे  लॉकडाऊनबाबत सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते. राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त राजेश टोपे यांनी फेटाळून लावले. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस