Maharashtra Corona Update: मोठा दिलासा! आता ५०० रुपयांत होणार कोरोनाची  'RTPCR' चाचणी; राजेश टोपेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 09:04 PM2021-03-31T21:04:35+5:302021-03-31T21:05:19+5:30

Maharashtra Corona Test Price Updates: राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे.

big relief to maharashtra Corona rtpcr test will now cost Rs 500 announcement by health minister Rajesh Tope | Maharashtra Corona Update: मोठा दिलासा! आता ५०० रुपयांत होणार कोरोनाची  'RTPCR' चाचणी; राजेश टोपेंची घोषणा

Maharashtra Corona Update: मोठा दिलासा! आता ५०० रुपयांत होणार कोरोनाची  'RTPCR' चाचणी; राजेश टोपेंची घोषणा

Next

Maharashtra Corona Update: राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच 'रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज' तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट १५० रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

भयावह! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; मृतांच्या आकड्यानं चिंता वाढली

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन तब्बल ४५०० रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ५०० रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असणार आहे. 

ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने सिलिंडर घेऊन कोरोना रुग्ण महापालिकेच्या प्रवेशद्वारावर

याआधी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे १२००, ९८० आणि ७०० रुपये असे दर करण्यात आले होते. आजच्या निर्यानुसार कोरोना चाचण्यांसाठी ५००, ६०० आणि ८०० रुपये असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ५०० रुपये  आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी ८०० रुपये आकारण्यात येणार आहेत. 

राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे.
 

Web Title: big relief to maharashtra Corona rtpcr test will now cost Rs 500 announcement by health minister Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.