शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Coronavirus in Maharashtra Live Updates: पेंच व्याघ्र प्रकल्पातील १० गाईड्स, १३ जिप्सी चालकांना होम क्वॉरेंटाईन करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 22:04 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यानं कलम 144 लागू केलं असून, मुंबईतली लोकल सेवा, लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या बंद केलेल्या आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 89वर पोहोचली असून, त्यांच्यावर सध्या कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहे. तर राज्यात कोरोनानं आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यानं कलम 144 लागू केलं असून, मुंबईतली लोकल सेवा, लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या बंद केलेल्या आहेत. तसेच लोकांना 31 मार्चपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यातल्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

-  नागपूर- पेंच व्याघ्र प्रकल्पातील 10 गाईड्स आणि 13 जिप्सी चालकांना होम क्वॉरेंटाईन ठेवण्याच्या सूचना- सांगलीत कोरोनाचे चार रुग्ण आढळले; सौदीहून परतलेल्या चार जणांना कोरोनाची बाधा- राज्यात संचारबंदी लागू, जिल्ह्याच्या सीमादेखील बंद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मोठ्या घोषणा 

- नांदेडमध्ये ३१ मार्चपर्यंत पेट्रोल, डिझेल बंद; केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मिळणार इंधन- राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारातकोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र होत असतानाच आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी वाहतुकीबाबत एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. 

- लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आजपासून हायजेनिक रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले जात आहे. १ एप्रिलपर्यंत सकाळी ९ ते ५ या कालावधीत हे शिबिर चालणार आहे.

- लॉक डाऊन असलेल्या शहरांमध्ये ओला-उबरची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

-  शासनस्तरावर आखल्या जात असलेल्या विविध उपायोजनांचाच एक भाग म्हणून महावितरणकडून आता वीज ग्राहकांचे मिटर रिडींग घेणे व वीज बिल वितरीत करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे. 

- 14 दिवसांच्या संघर्षानंतर पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधिताला आता घरी जाण्याचे वेध

- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीन हजारांहून अधिक अंकांनी, तर निफ्टीसुद्धा मोठ्या प्रमाणावर खाली आला आहे.

- नवी मुंबई आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट 25 मार्चपर्यंत बंद राहणार;भाजीपाला मार्केट 31 मार्चपर्यंत बंद राहणार

- जनता कर्फ्यूनंतर सोमवारी मोठ्या संख्येने बाहेर पडलेल्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश रोखले- कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत-राज्यात आजपासून बंद;लोकल, लांबपल्ल्याच्या रेल्वेसह एसटी, खासगी बसगाड्या, रस्ते वाहतूकही बंद 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस